नवी दिल्ली 12 डिसेंबर : पंतप्रधान कार्यालयाने (PMO) रविवारी पहाटे उघड केलं की काही मिनिटांसाठी हॅकर्सने पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विटर हँडल हॅक केलं होतं (Twitter Handle of PM Narendra Modi). अकाऊंट रिस्टोअर केल्यानंतर पीएमओकडून ही माहिती देण्यात आली आहे. पीएमओनं ट्विट केलं की, ‘पीएम नरेंद्र मोदी यांचं ट्विटर हँडल काही काळासाठी हॅक झालं (Twitter Account Hack). हा मुद्दा ट्विटरकडे उपस्थित करण्यात आला आहे आणि अकाऊंटदेखील त्वरित रिस्टोअर आणि सुरक्षित करण्यात आले आहे. हॅक झाल्यानंतर काही मिनिटांत शेअर केलेल्या ट्विटकडे दुर्लक्ष करा.
The Twitter handle of PM @narendramodi was very briefly compromised. The matter was escalated to Twitter and the account has been immediately secured.
— PMO India (@PMOIndia) December 11, 2021
In the brief period that the account was compromised, any Tweet shared must be ignored.
अकाऊंटवरुन केलेले निरुपयोगी ट्विट आता हटवण्यात आले आहेत. ट्विटरवर पीएम मोदींचे 2.34 कोटींहून अधिक फॉलोअर्स आहेत. पंतप्रधान मोदींचं ट्विटर अकाउंट हॅक झाल्यानंतर भारतात #Hacked हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला. हॅकर्सचे ट्विट आता हँडलवरून हटवलं गेलं असलं तरी, काही वापरकर्त्यांनी त्याचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. यात असं म्हटलं आहे की भारतने बिटकॉइनला कायदेशीर मान्यता दिली आहे. चार दशकं रखडलं, मोदी सरकारने हेरलं, शेतकऱ्यांचा स्वप्नवत शरयू प्रोजेक्ट पूर्ण ट्विटच्या स्क्रीनशॉटनुसार यात लिहिलं आहे की, ‘भारताने अधिकृतपणे बिटकॉइनला कायदेशीर मान्यता दिली आहे आणि सरकार 500 बीटीसी विकत घेत आहे आणि लोकांमध्ये वितरित करत आहे.’ हॅकर्सनी पंतप्रधान मोदींच्या हँडलवरून केलेल्या ट्विटचा स्क्रीनशॉट शेअर करत युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बीवी यांनी लिहिलं, ‘गुड मॉर्निंग मोदी जी, सब चंगा सी?’
Good Morning Modi ji,
— Srinivas BV (@srinivasiyc) December 11, 2021
Sab Changa Si?
SS Credit : @AdityaRajKaul pic.twitter.com/0YLVdzmreq
काही युजर्स सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. ट्विटचा स्क्रीनशॉट शेअर करत वेद काकडे नावाच्या युजरने लिहिलं की, ‘कृपया या लिंकवर क्लिक करू नका. हा घोटाळा आहे… पंतप्रधान मोदींचे खातेही सुरक्षित नाही. हॅकर्स, स्कॅमर्स आणि परदेशी अजेंडापासून भारतात सोशल मीडिया कसा सुरक्षित राहू शकतो. याआधी सप्टेंबर 2020 मध्ये देखील अज्ञात हॅकर्सच्या एका गटाने पीएम मोदींची वैयक्तिक वेबसाइट आणि मोबाइल अॅप हॅक केले होते.