गेल्या चार दशकांपासून प्रलंबित असलेला उत्तर प्रदेशातील सरयू नहार राष्ट्रीय प्रकल्प आता मोदी सरकारमुळं मागच्या चार वर्षांत पूर्ण झाला आहे.
शेतकरी कल्याण आणि सक्षमीकरणासाठी पंतप्रधानांची दृष्टी आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रदीर्घ प्रलंबित प्रकल्पांना प्राधान्य देण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेमुळे या प्रकल्पावर अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे, असं सरकारनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
घाघरा, सरयू, राप्ती, बाणगंगा आणि रोहिणी या पाच नद्यांना जोडण्याचं काम या प्रकल्पामार्फत होणार आहे. त्यामुळं प्रदेशातील शेतकऱ्यांना याचा फायदा होईल.
पूर्व उत्तर प्रदेशातील नऊ जिल्ह्यांना या प्रकल्पाचा फायदा होईल. त्यात बहराइच, श्रावस्ती, बलरामपूर, गोंडा, सिद्धार्थनगर, बस्ती, संत कबीर नगर, गोरखपूर आणि महाराजगंज या जिल्ह्यांचा समावेश आहे.
सरयू नहार राष्ट्रीय प्रकल्पावर गेल्या गेल्या चार वर्षांत 4600 कोटी रुपयांहून अधिकचा खर्च झाला आहे.
प्रकल्पातील विलंबाचा त्रास झालेल्या प्रदेशातील शेतकऱ्यांना आता उन्नत सिंचन क्षमतेचा मोठा फायदा होईल, असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.
शेतकरी आता मोठ्या प्रमाणावर पिकांचं उत्पन्न घेण्यास सक्षम होतील आणि प्रदेशाची कृषी क्षमता वाढवू शकतील, असं सरकारनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.