मराठी बातम्या /बातम्या /देश /

प्राचीन गडावरील खजिना चोरांनी केला लंपास; 100 वर्षांपासून बंद होती ती गुप्त खोली!

प्राचीन गडावरील खजिना चोरांनी केला लंपास; 100 वर्षांपासून बंद होती ती गुप्त खोली!

हा गड 100 वर्षे जुना असल्याचं सांगितलं जात आहे. कोणालाच या गुप्त खोलीबद्दल माहिती नव्हती.

हा गड 100 वर्षे जुना असल्याचं सांगितलं जात आहे. कोणालाच या गुप्त खोलीबद्दल माहिती नव्हती.

हा गड 100 वर्षे जुना असल्याचं सांगितलं जात आहे. कोणालाच या गुप्त खोलीबद्दल माहिती नव्हती.

  • Published by:  Meenal Gangurde

जयपूर, 10 जानेवारी : राजस्थानमधील (Rajasthan News) भीलवाडा येथे 100 वर्षांहून अधिक जुन्या गडावर गुप्त खोली सापडली आहे. गावकऱ्यांचं म्हणणं आहे की, हे राजा-महाराजांच्या काळातील आहे. या खोलीत खजिनाही होता, जो चोरीला गेल्याचा दावा केला जात आहे. गुप्त खोलीचं वृत्त समोर आल्यानंतर गावकरीही जमा झाले. जिल्ह्यातील संगरिया गावात शनिवारी रात्री खंडहरनुमा गडावर अज्ञातांनी तोडफोड केली. (treasure on the ancient fort was stolen by thieves )

येथे एक मंदिरदेखील आहे. रविवारी सकाळी पुजारी शंकर लाल शर्मा गडावरील मंदिरात पूजा करण्यासाठी पोहोचला तर खोलीचं टाळं तोडलेलं होतं. त्यांनी चोरीची शक्यता व्यक्त करीत गावकऱ्यांना बोलावलं. तेथे एका जुन्या लायब्ररीचं टाळंही तुटलं होतं. ( secret room had been closed for 100 years ) आता जाऊन पाहिलं तर एक भिंतदेखील तुटलेली होती. गावकऱ्यांनी सांगितलं की, येथे एक गुप्त खोली सापडली आहे.

हे ही वाचा-'12 कोटी द्या अन्यथा...' हॅकर्सकडून Bajaj Financeकंपनीच्या संजीव बजाज यांना धमकी

खोलीत सापडलं संदूक खेचल्याचं निशाण...

सध्या हा विषय गावात चर्चिा जात आहे. गावकऱ्यांनी सांगितलं की, हा तहखाना आणि गुप्त खोलीतून संदूक खेचल्याचे निशाण सापडले आहेत. त्यामुळे राजा महाराजांच्या काळात येथे खजिना लपवल्याचा दावा केला जात आहे. चोरांनी हा खजिना चोरी केल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. सध्या या प्रकरणात तपास सुरू आहे. दैनिक भास्करने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

40 वर्षांपासून सुरू होती शाळा, चार वर्षांपूर्वीच झाली होती शिफ्ट..

अत्यंत प्राचीन असलेल्या या गडावर गेल्या 40 वर्षांपासून शाळा सुरू होती. अवघ्या 4 वर्षांपूर्वीच येथील शाळा दुसऱ्या इमारतीत शिफ्ट करण्यात आली होती. यानंतर गड बंद करण्यात आला होता. केवळ या गडावर असलेल्या जैमती माताच्या मंदिरात पुजारी नियमित पुजा करण्यासाठी येत होता.

First published:

Tags: Rajasthan