पुणे, 09 जानेवारी: बजाज फायनन्स कंपनीचे (Bajaj Finance Company) संजीव बजाज (Sanjeev Bajaj) यांच्याकडे ई-मेलद्वारे अज्ञात हॅकर्सने 12 कोटी रुपयांची खंडणी (Demand 12 crore) मागितल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खंडणीची रक्कम न दिल्यास कंपनीचा सर्व डेटा हॅक (Threat to hack data) केला जाईल, ज्यामुळे कंपनीचं मोठं नुकसान होऊ शकतं, अशी धमकी हॅकर्सने दिली आहे. धमकीचा ई मेल आल्यानंतर विमानतळ पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर चोरट्याविरोधात गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे.
बजाज फायनान्स कंपनीतर्फे युवराज मोरे (32, रा. हडपसर) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीचे वरिष्ठ अधिकारी संजीव बजाज, दीपक रेड्डी, दीपक बजारी आणि संजीव जैन यांना natasa.petrova@protomail.com या ई-मेल आयडीवरुन धमकीचा मेल पाठवण्यात आला आहे.
हेही वाचा-थरारक! मध्यरात्री रंगला खुनी खेळ; कुऱ्हाडीने घाव घालत पत्नीला केलं रक्तबंबाळ मग
खंडणीची रक्कम DOGE COIN या क्रिप्टो चलनाच्या माध्यमातून द्यावी, अशी मागणी सायबर चोरट्यांकडून करण्यात आली आहे. आरोपींनी 11 कोटी 63 लाख 29 हजार 217 रुपये डोजे कॉइन ऍड्रेसवर पाठवण्यास सांगितलं होतं. हा मेल 28 नोव्हेंबर 2021 रोजी पाठवण्यात आला होता. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मंगेश जगताप करत आहेत.
हेही वाचा-अपमानाचा घेतला भयंकर बदला; खिंडीत गाठून मालकाचा खेळ खल्लास, दरीत फेकला मृतदेहखंडणीसाठी क्रिप्टो करन्सीचा वापर
डोजे कॉइन ही क्रिप्टो करन्सी आहे. ती परदेशातील दोन संगणक अभियत्यांनी बनवली आहे. सायबर भामट्यांनी डोजे कॉइनच्या माध्यमातून 7395373 इतकी रक्कम मागितली आहे. ही रक्कम भारतीय चलनात तब्बल 11 कोटी 63 लाख 29 हजार 217 रुपये इतकी आहे. ही रक्कम लवकरात लवकर दिली नाही, तर कंपनीचा सर्व डेटा हॅक करण्यात येईल, यामुळे कंपनीचं मोठं नुकसान होऊ शकतो, अशी धमकीवजा इशारा ई-मेलमधून देण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.