नवी दिल्ली 15 मे : असानी चक्रीवादळानंतर देशाच्या उत्तरेत तीव्र उष्णतेची (heat wave) लाट आली आहे. देशाच्या राजधानीसह अन्य राज्यात अक्षरश: सूर्य आग ओखत असल्याने तेथील नागरिकांचे जनजीवर विस्कळीत झाले आहे. कडक उन्हामुळे नागरिकांना घराबाहेर पडता येत नाही. राजधानी दिल्लीत आजचे तापमान ४९ अंश सेल्सिअसच्या जवळ पोहोचले आहे. (Delhi today temperature) दुसरीकडे, नजफगडमध्ये ४८.८ अंश सेल्सिअस तर रोहतकमध्ये ४८ अंश सेल्सिअस तापमान होते. हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, उद्या (दि.16) सोमवारी देशाची राजधाना दिल्ली येथे धुळीचे वादळ येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे उष्माघातासोबत दिल्लीकरांना आता धुळ खावी लागण्याची शक्यता आहे.
तर दुसरीकडे, राजस्थानमध्ये आजचे कमाल तापमान ४८.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. राजस्थानमधील अनेक जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. आज रविवार जम्मूमध्ये सर्वात उष्ण दिवस म्हणून होता. येथील तापमान ४३.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. आयएमडीने रविवारी सांगितले की, पुढील पाच दिवस उत्तर पश्चिम आणि मध्य भारतातील राज्यांमध्ये तीव्र उष्णता असेल.
हे ही वाचा : heat wave : अबब! या जिल्ह्यात तापमानाचा उच्चांक, 24 तासांत 46.5 अंश तापमानाची नोंद
पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे या राज्यांमध्ये उष्णतेची लाट
हवामान खात्याच्या माहितीनुसार, 16 मे पासून पूर्व राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि हरियाणामध्ये लोकांना उष्णतेचा सामना करावा लागू शकतो. 17 मे पासून जम्मू, झारखंड, विदर्भ, मध्य प्रदेश, दिल्ली, हरियाणा आणि मध्य प्रदेशच्या विविध भागांमध्ये उष्ण वारे वाहण्याची शक्यता आहे. यामुळे लोकांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो. यानंतर 18 मे नंतर राजस्थानच्या काही जिल्ह्यात उष्माघाताची शक्यता आहे. 19 मे रोजी मध्य प्रदेशातील काही भागात लोकांना उष्ण वाऱ्यांचा सामना करावा लागू शकतो.
हवामान खात्याने दिला इशारा
हवामान खात्याने म्हटले आहे की तीव्र उष्णतेने लहान मुले, वृद्ध आणि आजारांनी ग्रस्त लोकांसाठी आरोग्य सांभाळावे लागणार आहे. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, या भागातील लोकांनी उष्णतेच्या लाटेच्या सामना करण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी. हलक्या रंगाचे सैल, सुती कपडे परिधान करावेत आणि डोक्याला कापड, टोपी किंवा छत्री इत्यादींनी झाकावे.
विदर्भाला येले अलर्ट
पुढचे चार दिवस विदर्भासह मराठवाडा (Vidarbha, Marathwada) या भागात उष्णतेची लाट (heat wave) येणार असल्याचे हवामान खात्याकडून वर्तवण्यात आले होते. दरम्यान काल दिवसभरात विदर्भातील काही जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट (heat wave) जाणवू लागली आहे. शनिवारी (दि.14) वर्धा जिल्ह्याचे तापमान (wardha district temperature high) सर्वाधिक नोंदववण्यात आले. वर्ध्याचे तापमान शनिवारी 46.5 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. मागील 24 तासांत तापमानात 2.5 अंशांची वाढ झाली आहे. तर सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये सर्वाधिक कमी 29.7 (mahabaleshwar temperature) अंश तापमानाची नोंद झाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Delhi latest news, Delhi News, Heat, Wave, Weather, Weather forecast, Weather warnings