मराठी बातम्या /बातम्या /देश /तिरुपती मंदिराला केसांच्या विक्रीतून 126 कोटींची, तर लाडू प्रसादातून होणार 365 कोटींची कमाई

तिरुपती मंदिराला केसांच्या विक्रीतून 126 कोटींची, तर लाडू प्रसादातून होणार 365 कोटींची कमाई

तिरुपतीला जाणारे भाविक तिथं केसांचं दानही करत असतात. यंदा मंदिराला केसांच्या विक्रीतून 126 कोटी रुपयांची कमाई होण्याचा अंदाज आहे.

तिरुपतीला जाणारे भाविक तिथं केसांचं दानही करत असतात. यंदा मंदिराला केसांच्या विक्रीतून 126 कोटी रुपयांची कमाई होण्याचा अंदाज आहे.

तिरुपतीला जाणारे भाविक तिथं केसांचं दानही करत असतात. यंदा मंदिराला केसांच्या विक्रीतून 126 कोटी रुपयांची कमाई होण्याचा अंदाज आहे.

  नवी दिल्ली, 16 फेब्रुवारी : आंध्र प्रदेशमधील तिरुपती (Tirupati) मंदिर खूप प्रसिद्ध असून या मंदिराची मोठी मान्यता आहे. या ठिकाणी दर्शनासाठी आणि नवस फेडण्यासाठी केवळ देशभरातूनच नव्हे तर जगभरातून लोक येत असतात. या मंदिरात भाविकांची नेहमीच मांदियाळी असते. तिरुपतीला जाणारे भाविक तिथं केसांचं दानही करत असतात. या केसांपासून मंदिर प्रशासनाला मोठी कमाई होते. या मंदिरात दर्शनाला गेलं की देवाला डोक्यावरचे केस अर्पण करण्याची प्रथा आहे. यंदा मंदिराला केसांच्या विक्रीतून 126 कोटी रुपयांची कमाई होण्याचा अंदाज आहे.

  तिरुपती येथील तिरुमाला तिरुपती देवस्थानने (Tirumala Tirupati Devasthanams-TTD) गुरुवारी आपला 2022-23 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. तिरुमलाच्या प्राचीन भगवान वेंकटेश्वर मंदिराच्या (Lord Venkateswara Temple) प्रशासकीय मंडळाने 2022-23 च्या वार्षिक बजेटमध्ये 3,096.40 कोटी रुपयांच्या उत्पन्नाचा अंदाज व्यक्त केला आहे.

  बजेट बैठकीत (TTD Budget Meeting) पुढील 12 महिन्यांच्या आर्थिक योजनेचा आढावा घेतल्यानंतर, TTD बोर्डाचे अध्यक्ष वाय.व्ही. सुब्बा रेड्डी आणि कार्यकारी अधिकारी के. एस. जवाहर रेड्डी यांनी, बोर्डाने वार्षिक बजेटला मंजुरी दिली आहे, असं माध्यमांना सांगितलं.

  हे वाचा - काश्मीरच्या या गावात प्रत्येक घरात मुक-बहिरे! लष्कराच्या निर्णयाचा वाटेल अभिमान

  'लड्डू प्रसादम'च्या विक्रीतून 365 कोटी -

  मंदिराच्या वार्षिक उत्पन्नापैकी सुमारे 1,000 कोटी रुपये भक्तांकडून पवित्र 'हुंडी' (दान-पाट) मध्ये येण्याचा अंदाज आहे. राष्ट्रीयकृत आणि खासगी बँकांमधील ठेवींवर सुमारे 668.5 कोटी रुपये व्याज मिळेल. तसेच विविध तिकिटांच्या विक्रीतून 365 कोटी रुपये आणि ‘लड्डू प्रसादम’च्या (Tirupati Laddoo Prasadam) विक्रीतून 365 कोटी रुपये मिळण्याचा अंदाज बजेटमध्ये व्यक्त करण्यात आला आहे.

  याशिवाय टीटीडीला निवास आणि विवाह हॉलच्या भाड्यातून 95 कोटी रुपये आणि भाविकांनी अर्पण केलेल्या केसांच्या विक्रीतून 126 कोटी रुपये मिळतील अशी अपेक्षा आहे. दुसरीकडे विविध सेवांवर वर्षभरात 1,360 कोटी रुपये खर्च होणं अपेक्षित आहे.

  हे वाचा - वडिलांचं स्टेशनरी दुकान,मुलगा बनला करोडपती! Google ने या कारणामुळे दिले 65 कोटी

  ...म्हणून तिरुपतीत भक्त केस दान करतात

  तिरुपती बालाजी मंदिराबाबत असे मानले जाते की जो भाविक येथे येऊन केस (Hair) दान करतो, त्याच्यावर लक्ष्मीची कृपा होते आणि त्याची सर्व संकटं दूर होतात. देवी लक्ष्मी सर्व पापं आणि दुष्कृत्यांचा त्याग करणाऱ्या व्यक्तीचे सर्व दु:ख दूर करते, असं मानलं जातं. म्हणून इथं स्त्री-पुरूष आपले केस सर्व वाईट आणि पापांच्या रूपात सोडतात. दररोज सुमारे 20 हजार लोक तिरुपती मंदिरात केस दान करून जातात. हे काम पूर्ण करण्यासाठी मंदिर परिसरात सुमारे सहाशे न्हावी ठेवण्यात आले आहेत.

  First published:
  top videos