रायपूर, 17 सप्टेंबर: मुंबईतील साकीनाका याठिकाणी एका 30 वर्षीय महिलेवर बलात्कार करून हत्या (Sakinaka Rape and Murder Case) केल्याची घटना ताजी असताना, क्रूरतेचा कळस गाठणारी आणखी एक घटना उघडकीस आली आहे. सार्वजनिक नळावर पाणी भरण्यासाठी गेलेल्या तरुणीचं अपहरण करून तिचे हात पाय बांधून (tied her hands and feet) रात्रभर सामूहिक बलात्कार (gang raped whole night) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नराधम आरोपींनी तिला दोन दिवस अन्नाचा कणही खायला दिला नाही. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल केला असून तीन नराधमांना अटक (3 accused arrest) केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 सप्टेंबर रोजी पीडित तरुणी सायंकाळच्या सुमारास सार्वजनिक नळावर पाणी भरण्यासाठी गेली होती. पण रात्री उशीरापर्यंत घरी परतली नाही. त्यामुळे पीडितेच्या कुटुंबीयांनी रात्रभर तिचा सर्वत्र शोध घेतला. पण तिचा काहीही थांगपत्ता लागला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात जाण्यात मुलगी बेपत्ता असल्याची फिर्याद दाखल केली. संबंधित घटना छत्तीसगड येथील आहे.
हेही वाचा-अल्पवयीन मुलीला जिवंतपणी नरकयातना; दुप्पट वयाच्या पुरुषासोबत लग्न लावून अत्याचार
पीडितेच्या कुटुंबीयांनी फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास करत मुलीला शोधून काढलं आहे. दोन दिवसांनी 15 सप्टेंबर रोजी पीडित तरुणी गावातील विजय कंवर नावाच्या व्यक्तीच्या जनावरांच्या गोठ्यात जखमी अवस्थेत सापडली आहे. पीडितेची अवस्था पाहून पोलीसही हादरून गेले. तरुणी सापडल्यानंतर पोलिसांनी त्वरित तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे.
हेही वाचा-उल्हासनगरमध्ये 6 वर्षीय मुलीवर मामाकडून बलात्कार, 2 महिने अत्याचार केल्याचा संशय
याप्रकरणी पीडितेची चौकशी केली असता, गावातील तीन नराधमांनी केलेल्या अत्याचाराचा पाढाच तिने वाचला आहे. पीडितेनं दिलेल्या माहितीनुसार, गावातील बाल वसतिगृहाचा अधीक्षक विजय कंवर (वय-30), सरपंचाचा नातलग रामलाल कंवर उर्फ बल्ला (वय- 30) आणि हिरालाल (वय-26) या तिघांनी पीडितेचं अपहरण करून तिला आरोपी विजय कंवर यांच्या जनावरांच्या गोठ्यात घेऊन गेले. याठिकाणी आरोपींनी पीडितेचे हातपाय बांधून रात्रभर बलात्कार केला आहे. दरम्यान दोन दिवस आरोपींनी पीडितेला अन्नाचा कणही दिला नव्हता त्यामुळे पीडितेची अत्यंत वाईट अवस्था झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली असून पुढील कारवाई केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chhatisgarh, Gang Rape