मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /उल्हासनगर पुन्हा हादरलं! 6 वर्षीय चिमुकलीवर मामाकडून बलात्कार, 2 महिने अत्याचार केल्याचा संशय

उल्हासनगर पुन्हा हादरलं! 6 वर्षीय चिमुकलीवर मामाकडून बलात्कार, 2 महिने अत्याचार केल्याचा संशय

उल्हासनगरमध्ये 31 वर्षीय मामाने आपल्या 6 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

उल्हासनगरमध्ये 31 वर्षीय मामाने आपल्या 6 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

Rape in Ulhasnagar: उल्हासनगरमध्ये 31 वर्षीय मामाने आपल्या 6 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

उल्हासनगर, 17 सप्टेंबर: गेल्या आठवड्यात उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरात एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करून रात्रभर बलात्कार (Minor girl kidnap and rape) केल्याची घटना उघडकीस आली होती. हे प्रकरण ताजं असताना आता उल्हासनगरमध्ये नात्याला काळीमा फासणारं एक प्रकरण समोर आलं आहे. येथील एका 31 वर्षीय मामाने आपल्या 6 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार (uncle raped 6 years old niece) केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मामाला अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयानं 18 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

6 वर्षीय पीडित मुलगी उल्हासनगर पूर्वेत आपल्या आई वडिलांसोबत राहते. तिचे वडील बाहेर कामाला जातात, तर आईही भाजी विक्रीचा व्यवसाय करते. त्यामुळे दिवसभर घरी कोणी नसल्यानं पीडित मुलगी जवळच राहणाऱ्या आपल्या आजोबांच्या घरी खेळायला जाते. दरम्यान 31 वर्षीय मामाची आपल्याच भाचीवर वाईट नजर पडली.

हेही वाचा-मुंबईत विकृताकडून तरुणीचा छळ; फोटो मॉर्फ करून सोशल मीडियावर बदनामी

आरोपी मामाने आजोबांच्या घरी आलेल्या या अल्पवयीन भाचीला आपल्या वासनेचा शिकार बनवलं आहे. 13 सप्टेंबर रोजी आरोपीनं पीडित मुलीवर बलात्कार केला असता, तिच्या वागण्यावरून आईला संशय आला. यानंतर आईने पीडितेला विश्वासात घेत विचारपूस केली असता, तिने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला आहे. यानंतर पीडितेच्या आईने हिललाईन पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या भावाविरोधात फिर्याद दाखल केली आहे.

हेही वाचा-मुलाच्या छळवणुकीतून वृद्ध दाम्पत्याची सुटका; 10 दिवसात आलिशान घर सोडण्याचे आदेश

पोलिसांनी बलात्कारासह पोक्सो कायद्याअंतर्गत आरोपी मामावर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासांतच नराधम मामाला बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयानं आरोपीला 18 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. हिललाईन पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Rape on minor, Ulhasnagar