Home /News /ahmednagar /

नगरमध्ये अल्पवयीन मुलीला जिवंतपणी नरक यातना; दुप्पट वयाच्या पुरुषासोबत लग्न लावून लैंगिक अत्याचार

नगरमध्ये अल्पवयीन मुलीला जिवंतपणी नरक यातना; दुप्पट वयाच्या पुरुषासोबत लग्न लावून लैंगिक अत्याचार

Crime in Ahmednagar: नगर जिल्ह्यात अमानुषतेचा कळस गाठणारी घटना समोर आली आहे. येथील एका 13 वर्षीय मुलीचा 24 तरुणासोबत जबरदस्तीने विवाह लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

    अहमदनगर, 17 सप्टेंबर: बालविवाह (Child Marriage) करणं कायद्यानं गुन्हा असूनही राज्यातील ग्रामीण भागात अल्पवयीन मुलींचं जबरदस्तीने विवाह लावून दिल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यानंतर आता नगर जिल्ह्यात अमानुषतेचा कळस गाठणारी घटना समोर आली आहे. येथील एका 13 वर्षीय मुलीचा 24 तरुणासोबत जबरदस्तीने विवाह लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एवढंच नव्हे तर नवऱ्या मुलानं पीडित मुलीशी शारीरिक संबंध (Sexual relation with minor wife) ठेवत तिला जिवंतपणी नरक यातना दिल्या आहेत. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईसह आठजणांवर गुन्हा दाखल (FIR Lodged) करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे. संबंधित 13 वर्षीय पीडित मुलगी नेवासा फाटा येथील रहिवासी आहे. पीडितेची आई, मावशी आणि काकाने जबरदस्तीने तिचा विवाह एका 24 वर्षीय तरुणासोबत लावून दिला होता. लग्नानंतर पीडित मुलगी 5 सप्टेंबरपर्यंत सासरी राहिली आहे. दरम्यानच्या काळात नवऱ्यासह सासरच्या कुटुंबाकडून पीडितेला नरक यातना दिल्या आहेत. पतीनेही तिच्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार केले आहेत. घरकाम येत नसल्यानं नवऱ्यासह सासू सासऱ्यांनी शिवीगाळ करत अनेकदा मारहाण केली आहे. हेही वाचा-मुलाच्या छळवणुकीतून वृद्ध दाम्पत्याची सुटका; 10 दिवसात आलिशान घर सोडण्याचे आदेश 5 सप्टेंबर रोजी आरोपींनी पीडितेला बाहेरची बाधा झाल्याचं कारण देत माहेरी पाठवून दिलं आहे. त्यामुळे माहरेच्या कुटुंबानं तिला मांत्रिकाकडे नेलं असता, त्यानेही पीडितेला मारहाण केली आहे. यानंतर पीडित मुलगी  नेवासा तालुक्यातील खडका याठिकाणी आजोबांच्या घरी आल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली आहे. एवढं सर्व रामायण घडेपर्यंत पीडित मुलीच्या आईने याची माहिती आजोबांना देखील दिली नव्हती. हेही वाचा-उल्हासनगरमध्ये 6 वर्षीय मुलीवर मामाकडून बलात्कार, 2 महिने अत्याचार केल्याचा संशय दोन दिवसांपूर्वी पीडित मुलीने सर्व प्रकार आपल्या आजोबांना सांगितल्यानंतर नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पीडित मुलीची आई, मावशी व काकासह पती, सासू व सासरे आणि दोन मांत्रिक अशा आठजणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी बालविवाह प्रतिबंधक कायदा, पोक्सो आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत या गुन्ह्याची नोंद केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Ahmednagar, Crime news

    पुढील बातम्या