पाकिस्तानात डांबून ठेवलेल्या अधिकाऱ्यांना भारतात परत पाठवा; परराष्ट्र मंत्रालयाचा कडक इशारा

पाकिस्तानात डांबून ठेवलेल्या अधिकाऱ्यांना भारतात परत पाठवा; परराष्ट्र मंत्रालयाचा कडक इशारा

अद्याप पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहे. यापूर्वीही त्यांनी असा प्रकार केला होता

  • Share this:

नवी दिल्ली, 15 जून : पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये भारतीय उच्चायुक्तांचे दोन अधिकारी बेपत्ता झाल्यानंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तान उच्चायोगाचे कार्यकारी उच्चायुक्त यांना समन्स बजावले आहे. यादरम्यान पाकिस्तानचे कार्यकारी उच्चायुक्तांनी अधिकाऱ्यांचा छळ होणार नाही असे स्पष्ट केले आहे. संबंधित मुत्सद्दी अधिकाऱ्यांच्या संरक्षणाची जबाबदारी पाकिस्तानी अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.

त्याचबरोबर सूत्रांच्या माहितीनुसार, भारताने पाकिसानाला दोन्ही अधिकाऱ्यांना त्यांच्या वाहनांसह भारतीय उच्चायोग पाठविण्यात येण्याचे निर्देश दिले आहेत.

पाकिस्तानचा दावा

पाकिस्तानच्या जिओ टीव्हीवरील वृत्तानुसार पाकिस्तानने या दोन्ही अधिकाऱ्यांना हिट अँड रन प्रकरणात अटक केली आहे. जिओ न्यूजच्या म्हणण्यानुसार या दोन अधिकाऱ्यांच्या वाहनाने एक व्यक्ती गंभीर जखमी झाला होता. या दोन अधिकाऱ्यांनी त्या व्यक्तीला तिथेच सोडून पळ काढल्याचा आरोपही पाकिस्तानने केला आहे. त्यानंतर त्या दोघांना अटक करण्यात आली आहे.

काय आहे प्रकार?

इस्लामाबादमध्ये भारतीय उच्चायुक्तालयात काम करणारे दोन भारतीय अधिकारी सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास हाय-कमिशनकडे जाण्यासाठी त्यांच्या वाहनाने निघाले होते. परंतु ते उच्चायुक्तालयात पोहोचले नाहीत. भारतीय विदेश मंत्रालयाने यासाठी पाकिस्तानचे कार्यकारी उच्चायुक्त यांना याबाबत महिती दिली होती. त्यानंतर कथित हिट अँड रन प्रकरणात या अधिकाऱ्यांना अटक करण्यात आल्याची माहिती मिळाली.

भारतीय मुत्सद्दीला धमकावण्याचा प्रयत्न

यापूर्वी पाकिस्तानातील भारतीय मुत्सद्दीला धमकावण्याचा प्रयत्न केल्याच्या बातम्या आल्या होत्या. आयएसआयच्या काही एजंटनी भारतीय मुत्सद्दीचा पाठलाग केल्याचे वृत्त आहे. भारतीय मुत्सद्दीसोबत झालेल्या या घटनेनंतर भारताने तीव्र विरोध व्यक्त केला.

हे वाचा-नैराश्यातून घडलेली धक्कादायक घटना; व्यावसायिकाने स्वत:च्याच हत्येची दिली सुपारी

 

संपादन - मीनल गांगुर्डे

First published: June 15, 2020, 7:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading