• Home
  • »
  • News
  • »
  • coronavirus-latest-news
  • »
  • कोरोना लढ्यात भारताची कमाल! यूके, यूएससह 18 देशांना एकत्र जमलं नाही ते एकट्याने करून दाखवलं

कोरोना लढ्यात भारताची कमाल! यूके, यूएससह 18 देशांना एकत्र जमलं नाही ते एकट्याने करून दाखवलं

कोरोना लढ्यात भारताने रेकॉर्ड केला आहे, जागतिक आरोग्य संघटनेनंही भारताचं कौतुक केलं आहे.

  • Share this:
नवी दिल्ली, 16 सप्टेंबर : कोरोनावर प्रभावी उपाय म्हणून नाही, पण कोरोना प्रतिबंधासाठी सध्या उपलब्ध असलेला सर्वोत्तम पर्याय म्हणून लसीकरणाकडे (Corona vaccination) पाहिलं जात आहे. लसीकरणामुळे (Corona vaccine) काही प्रमाणात दैनंदिन व्यवहार सुरू करण्यात कित्येक देशांना यश मिळालं आहे. भारतातही मोठ्या प्रमाणात कोरोना प्रतिबंधक लसीकरण (Corona vaccination in India) सुरू आहे. खरं तर, जगातल्या इतर कोणत्याही देशापेक्षा भारतात सर्वाधिक वेगाने लसीकरण केलं जात आहे (India Corona vaccine record). विशेष म्हणजे जगातल्या 18 मोठ्या देशांमध्ये मिळून एका दिवसात सरासरी 8.17 दशलक्ष डोस दिले जात आहेत. एकट्या भारतामध्ये एका दिवसात सरासरी 8.57 दशलक्ष डोस (India one day vaccination record) दिले जात आहेत. यावरूनच आपल्याकडे किती मोठ्या प्रमाणात लसीकरण (India vaccination record) सुरू आहे याचा अंदाज येईल. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिका, यूके, कॅनडा, अर्जेंटिना, ब्राझील, फ्रान्स, स्पेन, इटली, जर्मनी, सौदी अरेबिया, टर्की, दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, जपान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, रशिया आणि स्वित्झर्लंड या सर्व देशांमध्ये मिळून एका दिवसात जेवढं लसीकरण होतं, त्यापेक्षा जास्त लसीकरण (India corona vaccination) भारतात एका दिवसात होत आहे. हे वाचा - भारताने 13 दिवसांत दिले तब्बल 10 कोटी डोस, WHO ने केलं कौतुक कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा देशाला मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. यानंतर आता वर्षाअखेरीपर्यंत कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती संशोधक व्यक्त करत आहेत. त्यामुळे तिसरी लाट येण्यापूर्वीच देशातल्या (Vaccination before third wave) सर्व नागरिकांना लशीचं संरक्षण कवच देण्याचा केंद्र शासनाचा निर्धार आहे. कोरोनाची तिसरी लाट (Third wave of corona) येण्याची भीती असतानाच, लसीकरणाची ही आकडेवारी नक्कीच दिलासादायक आहे. देशात आतापर्यंत कोरोना लशींचे एकूण 76,57,17,137 डोसेस दिले गेले आहेत. यातले 64,51,423 डोस हे केवळ गेल्या 24 तासांमध्ये देण्यात आले. हे वाचा - मुंबईकरांवर बाप्पाने केली कृपा! गणेशोत्सवातच मिळाली मोठी GOOD NEWS दरम्यान, देशात गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाच्या 30,570 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. तसंच, 38,303 रुग्णांनी कोरोनावर मात (India corona update) केली आहे. याच कालावधीमध्ये 431 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचंही आरोग्य विभागाने स्पष्ट केलं. यानंतर आता देशातल्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या 3 कोटी 33 लाख 47 हजार 325 झाली आहे. कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 3 कोटी 25 लाख 60 हजार 474 एवढी झाली आहे. यासोबतच, आतापर्यंत देशात 4 लाख 43 हजार 928 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.
First published: