जयपूर, 15 सप्टेंबर : आईवडिल (Parents) तंबू ठोकण्यात व्यस्त असताना तळ्याकडे गेलेल्या तीन लहान मुलांचा (Three Children) पाण्यात बुडून मृत्यू (Death) झाला. आईवडील रात्रीच्या मुक्कामासाठी तंबू ठोकण्यात व्यस्त असताना शेजारी खेळणारी मुलं तळ्याकडे कधी गेली, हे त्यांना समजलंच नाही. मुलांना पाण्यात बुडताना पाहून आईवडिलांनी तिकडे धाव घेतली, मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली होती. अशी घडली दुर्घटना राजस्थानच्या जयपूरजवळ असणाऱ्या गोनेर धाम भागात हातावर पोट असणारी काही कुटुंब राहतात. भटकंती करून मिळेल ते काम करून पोट भरण्याचा त्यांचा दिनक्रम असतो. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे रात्रीच्या वेळी मिळेल त्या जागेत तंबू ठोकून ते मुक्काम करतात. गोनेर धाम भागात ही कुटुंब तंबू ठोकत असताना त्यांची 3 लहान मुलं शेजारी खेळत होती. जवळच पावसाचं पाणी साठून एक तळं तयार झालं होतं. खेळता खेळता ही मुलं तिकडे गेली. काही कळायच्या आत ही मुलं तळ्यात उतरली. त्यातील कुणालाही पोहता येत नसल्यामुळे तळ्यात पडताच ती बुडू लागली. काम करणाऱ्यांनी जेव्हा ही गोष्ट पाहिली, तेव्हा त्यांनी तातडीने तळ्याकडे धाव घेतली. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. तिन्ही मुलं तळ्यात बुडाली होती. आईवडिलांनी आरडोओरडा करत गावातील लोकांना बोलावलं आणि मुलांना बाहेर काढण्यात आलं. मात्र तोपर्यंत या तिन्ही मुलांचे जीव गेले होते. या घटनेत गुलशन (वय 9), शाहिना (वय 8) आणि नब्बू (वय 8) या तीन चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत झाला, अशी बातमी ‘ दैनिक भास्कर' ने दिली आहे. हे वाचा - Shocking! उंची वाढण्यासाठी आईकडून मुलीचा भयानक छळ; दिली आयुष्यभराची शिक्षा पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत तिन्ही मुलांना ऍम्ब्युलन्सने हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र तिथं त्यांना मृत घोषित करण्यात आलं. पोलिसांनी तिघांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.