जाहिरात
मराठी बातम्या / देश / मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी, व्हॉट्सॲपवर आला मेसेज

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी, व्हॉट्सॲपवर आला मेसेज

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी, व्हॉट्सॲपवर आला मेसेज

‘मुख्यमंत्री योगी यांना मी बॉम्बने उडवणार आहे,’ असं मेसेजमध्ये म्हटलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

लखनऊ, 23 मे: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. सोशल मीडिया डेस्कच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर धमकीचा मेसेज मिळाला आहे. ‘मुख्यमंत्री योगी यांना मी बॉम्बने उडवणार आहे,’ अशी धमकी देत एका विशेष समुदायासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ शत्रू बनले असल्याचे या मेसेजमध्ये म्हटलं आहे. या प्रकरणी गोमती नगर पोलिस स्टेशनमध्ये कलम 505(1)b 506,आणि 507नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेही वाचा..  ज्येष्ठ कामगार नेते व जितेंद्र आव्हाड यांचे सासरे डॉ. दादा सामंत यांची आत्महत्या 8828453350 या क्रमांकावरून गुरुवारी रात्री 12.32 वाजता उत्तर प्रदेश 112 हेल्प डेस्कच्या 7570000100 या व्हॉट्सॲप क्रमांकावर हा धमकीचा मेसेज पाठवण्यात आला. पोलिस या मोबाइल क्रमांकाचा शोध घेत आहेत, अशी माहिती गोमती नगर पोलिस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक धीरजकुमार यांनी दिली आहे. या प्रकरणाची चौकशी एसटीएफकडे सोपवण्यात आली आहे. आरोपीच्या संदर्भात पोलिसांना अनेक माहिती मिळाली आहे. पोलिस या प्रकरणी आरोपीचा शोध घेत असल्याची माहिती लखनऊचे पोलिस आयुक्त सुजीत पांडे यांनी सांगितलं आहे. हेही वाचा..  लॉकडाऊनमध्ये कसंबसं गाव गाठलं, आता उघड्यावर क्वारंटाइन होण्याची वेळ

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात