लखनऊ, 22 मे : कोरोनामुळे जगभरात हाहाकार उडाला आहे. देशात चौथ्या लॉकडाऊनच्या काळात प्रवासी मजुरांना घरी जाण्यासाठी सोय करण्यात आली आहे. आता उत्तर प्रदेशातील आझमगढ इथं गावी गेलेल्या मजुरांना उघड्यावर क्वारंटाइन होण्याची वेळ आली आहे. कडक उन्हाचा तडाखा सहन करत हे प्रवासी क्वारंटाइन झाले आहेत. प्रशासनाने कोणतीच व्यवस्थ न केल्यानं मजुरांनी आंब्याच्या बागा आणि शेतात मुक्काम केला आहे.
आझमगढ इथं बाहेरून आलेले मजूर त्यांच्या जवळच्या लोकांचा जीव धोक्यात घालयचा नाही म्हणून कडक उन सहन करत राहणं पसंद केलं आहे. प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही मजुरांनी केला आहे. लॉकडाऊन झाल्यानंतर दीड महिन्याने घरी येण्याचा निर्णय महेंद्र नावाच्या मजुराने घेतला. जेव्हा गावी पोहोचला तेव्हा राहण्यासाठी व्यवस्था नव्हती. तेव्हा घराच्या बाहेरच एका मोकळ्या जागी प्लास्टिकच्या सहाय्यानं सावली करून रहायला लागला.
उघड्यावरच क्वारंटाइन झाल्यानंतर घरचे लोक जेवण आणून देतात. घरच्या लोकांचा जीव धोक्यात येऊ नये यासाठी हा त्रास सहन करत असल्याचं महेंद्रने सांगितलं. कोरोनामुळे लॉकडाऊन झालं आणि हातातलं काम गेलं. परराज्यातून जमेल तसा प्रवास करत घर गाठलं. इथं आल्यावर क्वारंटाइन होण्यासाठी प्रशासनाकडून कोणती सोय नाही.
हे वाचा : आर्थिक संकटाने घेतला बळी; मुंबईहून सायकलवर घरी परतलेल्या मजुराची आत्महत्या
ग्रामपंचायतीकडून शाळेचं कुलुप काढलं नसल्यानं बाहेरच राहण्याचा निर्णय घ्यावा लागला. ही फक्त महेंद्रची कथा नाही तर अशा अनेक मजुरांनी उघड्यावरच मुक्काम केला आहे. उन्हाचा तडाखा जास्त असतो तेव्हा एखाद्या झाडाखाली थांबायचं असं करत दिवस ढकलत असल्याचं त्यांनी सांगितलं.
हे वाचा :
मोठी बातमी! लॉकडाऊनमुळे देशातील 29 लाख लोक कोरोनापासून वाचले - सरकारचा दावा मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.