पटना, 18 ऑगस्ट : अफगाणिस्तानात (Afghanistan) तालिबाननं (Taliban) सत्ता मिळवल्यानंतर भारतात त्यावरून जोरदार राजकीय वाद (political debate) सुरू झाले आहेत. ज्यांना भारतात राहण्याची भीती वाटते, त्यांनी खुशाल अफगाणिस्तानात निघून जावं, तिथं पेट्रोलही स्वस्त आहे, असं विधान बिहारमधील भाजप आमदार हरिभूषण ठाकूर (BJP MLA Haribhushan Thakur) यांनी केलं आहे. नुकतंच समाजवादी पक्षाचे खासदार डॉ. शफिकुर्रहमान बर्क (Dr. Shafikurrehman Bark) यांनी तालिबानबाबत केलेल्या विधानावरून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काय म्हणाले ठाकूर अफगाणिस्तानमधील परिस्थितीचा भारतावर कुठलाही परिणाम होणार नाही. मात्र ज्या लोकांना भारत असुरक्षित आहे, असं वाटतं त्यांनी अफगाणिस्तानमध्ये जावं, असा असा सल्ला त्यांनी दिला आहे. तिथं पेट्रोलही स्वस्त असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर समाजातून काय प्रतिक्रिया येतात, याबाबत उत्सुकता आहे. बर्क यांच्या विधानावरून वाद समजावादी पक्षाचे खासदार डॉ. शफिकुर्रहमान बर्क यांनी तालिबानच्या लढ्याचं कौतुक करत त्याची तुलना स्वातंत्र्यलढ्याशी केली होती. परकियांच्या आक्रमणातून स्वतःचा देश स्वतंत्र करण्याचा लढा म्हणून तालिबानच्या संघर्षाकडे बघायला हवं, असं त्यांनी म्हटलं होतं. धर्माच्या नावावर होणाऱ्या लढाया थांबल्या नाहीत, तर भारताचा अफगाणिस्तान व्हायला वेळ लागणार नाही, असं विधानही त्यांनी केलं होतं. लोकांना ही मुलभूत बाब समजत नसून प्रत्येकानं व्होट बँकेच्या राजकारणापलिकडे जाऊन याचा विचार करण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यावरून त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. हे वाचा - तुरुंगातला एक दिवस; कर्नाटकात मांडण्यात आली तुरुंग पर्यटनाची संकल्पना अफगाणिस्तानचे राजकीय पडसाद अफगाणिस्तानमध्ये घडणाऱ्या राजकीय घडामोडींवरून भारतातही उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. देशातील राजकीय परिस्थितीची आणि वैचारिक भूमिकेची तुलना काहीजण अफगाणिस्तानशी करताना दिसत आहेत, तर काहीजण अफगाणिस्तानकडे बोट दाखवत आपल्या देशातील परिस्थिती उत्तम असल्याचे दाखले देत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.