मराठी बातम्या /बातम्या /देश /उलटी करण्यासाठी डोकं बसच्या बाहेर काढलं अन् विपरीतच घडलं, 13 वर्षीय मुलीचं शीर धडावेगळं

उलटी करण्यासाठी डोकं बसच्या बाहेर काढलं अन् विपरीतच घडलं, 13 वर्षीय मुलीचं शीर धडावेगळं

चालत्या बसमधून डोकं बाहेर काढणं एका अल्पवयीनं मुलीच्या जीवावर बेतल्याचं (Minor Girl Dies in Accident) समोर आलं आहे. उलटी करण्याासाठी बसमधून डोकं बाहेर काढलेल्या या मुलीचं डोकं समोरुन येणाऱ्या एका ट्रकला धडकलं.

पटना 31 मार्च : चालत्या बसमधून डोकं बाहेर काढणं एका अल्पवयीनं मुलीच्या जीवावर बेतल्याचं (Minor Girl Dies in Accident) समोर आलं आहे. ही घटना आहे मध्य प्रदेशच्या खंडवा जिल्ह्यातील. उलटी (vomiting) करण्याासाठी बसमधून डोकं बाहेर काढलेल्या या मुलीचं डोकं समोरुन येणाऱ्या एका ट्रकला धडकलं. या भयंकर घटनेत मुलीचं शीर अक्षरशः धडावेगळं झालं. या घटनेत मुलीचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती देताना अप्पर पोलीस अधिक्षक सीमा अलावा यांनी सांगितलं, की ही घटना मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या आसपास घडली. त्यांनी सांगितलं, की ही घटना खंडवापासून जवळपास 35 किलोमीटर दूर असलेल्या इंदौर-इच्छापुर मार्गावरील रोशिया फाट्याजवळ घडली. मृत मुलीची ओळख तमन्ना अशी पटली असून ती खंडवाची रहिवासी होती. तिचं वय केवळ तेरा वर्ष होतं.

सीमा अलावा यांनी सांगितलं, की या घटनेवेळी तमन्नासोबत तिची आई रुखसाना आणि मोठी बहिण हिना हेदेखील त्याच बसमध्ये होते. तिघीही खंडवा येथून आपल्या नातेवाईकांच्या घरी बडवाह येथे निघाले होते. त्यांनी सांगितलं, की या प्रवासादरम्यान उलटी करण्यासाठी तमन्नानं आपलं डोकं खिडकीबाहेर काढलं. तेव्हाच समोरुन येणाऱ्या ट्रकला तिचं डोकं धडकलं. अपघात इतका भयंकर होता, की यात तिच्या डोक्याचा वरचा भाग वेगळा झाला आणि तिचा जागीच मृत्यू झाला.

अप्पर पोलीस अधिक्षक सीमा अलावा यांनी सांगितलं, की पोलिसांनी ट्रक आपल्या ताब्यात घेतली आहे. तर, ट्रकचा टालक सध्या फरार आहे. घटनेच्या वेळी ही बस खंडवा येथून इंदौरला जात होती. तर, ट्रक इंदौरवरुन येत होती. सीमा अलावा यांनी सांगितलं, की मृतदेह शवविच्छेदनानंतर कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे. पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे.

First published:
top videos

    Tags: Accident, Girl death, India, Major accident, Shocking news