बस आणि रिक्षाच्या भीषण अपघातात तेरा जणांचा जागीच मृत्यू, 12 महिलांचा समावेश

बस आणि रिक्षाच्या भीषण अपघातात तेरा जणांचा जागीच मृत्यू, 12 महिलांचा समावेश

मंगळवारी सकाळी बस आणि रिक्षाचा भयंकर अपघात (Road Accident in Madhya Pradesh) झाला आहे. या अपघातात तेरा जणांचा जागीच मृत्यू (13 People Killed in Road Accident) झाला आहे.

  • Share this:

पटना 23 मार्च : मध्य प्रदेशच्या ग्वालियरमध्ये मंगळवारी सकाळी बस आणि रिक्षाचा भयंकर अपघात (Road Accident in Madhya Pradesh) झाला आहे. या अपघातात तेरा जणांचा जागीच मृत्यू (13 People Killed in Road Accident) झाला आहे. यात रिक्षा चालकासह बारा महिलांचा समावेश आहे. या सर्व महिला अंगवणाडीच्या मुलांसाठी शाळेमध्ये पोषण आहार बनवण्यासाठी जात होत्या. ही रिक्षा ग्वालियरहून मुरैना रोडच्या चमन पार्ककडे निघाली होती. तर, बस ग्वालियहून मुरैनाकडे निघाली होती. ही घटना आनंदपूर ट्रस्ट रुग्णालयासमोर घडली आहे.

ही घटना इतकी भयंकर होती कि यात तेरा जणांचा जागीच मृत्यू झाला तर तिघांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरू केलं आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांना चक्का जाम केलं आहे तसंच बस चालकाच्या अटकेची मागणी केली आहे. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढण्यासोबतच जखमींना रुग्णालयात दाखल केलं आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Published by: Kiran Pharate
First published: March 23, 2021, 8:59 AM IST

ताज्या बातम्या