• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • परदेशातील वाढत्या कोरोनामुळे भारताला अधिक धोका, 13 राज्यांमध्ये रुग्णांची संख्या अधिक

परदेशातील वाढत्या कोरोनामुळे भारताला अधिक धोका, 13 राज्यांमध्ये रुग्णांची संख्या अधिक

Third wave In India: सर्वत्र लसीकरण (Corona Vaccination) वेगानं सुरु असतानाही कोरोना संक्रमित रुग्णांचे आकडे वाढताना दिसत आहे. ब्रिटन, अमेरिका आणि रशियासह काही मोठ्या देशात कोरोनाचे आकडे वाढत आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 22 जुलै: जगभरात कोरोना व्हायरसचं (Corona Virus) संकट आहे. सर्वत्र लसीकरण (Corona Vaccination) वेगानं सुरु असतानाही कोरोना संक्रमित रुग्णांचे आकडे वाढताना दिसत आहे. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट (Third Wave) आल्याचे हे संकेत असल्याचं दिसतंय. ब्रिटन, अमेरिका आणि रशियासह काही मोठ्या देशात कोरोनाचे आकडे वाढत आहे. त्यामुळे हे वाढते आकडे भारतासाठी धोका निर्माण करणारे आहेत. देशात जवळपास 68 टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज (Antibodies) सापडल्या आहेत. अशात कोरोना रुग्णांचा आकडा 40 हजारांच्या आसपास असणं ही एक धोक्याची घंटा आहे. तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे, की कोरोनाचे आकडे ज्या पद्धतीने स्थिर झाले आहेत ते पाहिल्यानंतर लवकरच ही आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेनंतर झालेल्या सेरो सर्वेक्षणात देशातील 68 टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज आढळले आहेत. यामध्ये ज्यांना लस देण्यात आली आहे त्यांचा देखील समावेश आहे. असं असतानाही देशातील 13 राज्यांमध्ये कोरोना संक्रमित रुग्णांच्या संख्येत वाढ नोंदवली जात आहे. केरळ, आंध्र प्रदेश, ओडिशा व्यतिरिक्त ईशान्येकडील अनेक राज्यांमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. पंकजा मुंडेंची नाराजी दूर करण्यासाठी भाजपचा बडा नेता भेटीला देशातील बर्‍याच राज्यात कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीवर वर्धमान महावीर मेडिकल कॉलेजचे कम्युनिटी मेडिसिन विभागाचे संचालक प्रोफेसर जुगल किशोर म्हणाले की, कोरोनाच्या दुसर्‍या लाटेनंतर लोकांमध्ये अँटीबॉडीजतयार झाले आहेत. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट पहिल्यासारखी भयानक ठरणार नाही. हे नक्कीच आहे की, कोरोनाची प्रकरणे ज्या वेगानं कमी होत होती त्यात आता स्थिरता आली आहे. त्यामुळे हे आता तिसऱ्या लाटेकडे निर्देशित करत आहे. अनेक देशांमध्ये अशीच परिस्थिती दिसून आली. Kolhapur Rain: कोल्हापूर जिल्ह्याल पुन्हा पुराचा धोका, NDRF ची टीम रवाना बर्‍याच राज्यांमध्ये कोरोनाच्या सक्रिय प्रकरणांमध्ये वाढ केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार केरळ, आंध्र प्रदेश, दिल्ली, उत्तराखंड आणि ईशान्येकडील आठ राज्यांसह एकूण 13 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याची नोंद करण्यात आली आहे. या महिन्याच्या सुरुवातीस अशी काही राज्ये होती जिथे कोरोनाचे रुग्ण वाढत होते. अशा परिस्थितीतच देशातल्या 13 राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.
  Published by:Pooja Vichare
  First published: