जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे. अशातच कोल्हापूर गगनबावडा मार्गावर पुराचं पाणी आलं असून कोल्हापूर गगनबावडा मार्गावरची वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसंच मांडुकली येथं कुंभी नदीचं दोन फूट पाणी रस्त्यावर आलं आहे. त्यातच धोक्याची पाणी पातळी गाठण्यासाठी पंचगंगा नदीत 4 फूट पाणी कमी आहे. त्यामुळे जिल्ह्यात असाच पाऊस राहिल्यास पंचगंगा नदी लवकरच धोक्याची पातळी ओलांडेल. 39 फूट ही पंचगंगा नदीची इशारा पातळी असून सध्या नदीची पातळी 36 फूट आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड, गगनबावडा तालुक्यांमध्ये रात्रभर अतिवृष्टी झाली आहे. बर्की गावात जाणाऱ्या पुलावर पाणी आल्यानं बर्की गावचा संपर्क तुटला आहे.EXCLUSIVE VIDEO: पुण्याहून कोल्हापूर कडे NDRF दोन तुकड्या रवाना pic.twitter.com/B1tslOB99v
— News18Lokmat (@News18lokmat) July 22, 2021
शाहुवाडी तालुक्यातील गेळवडे धरणातील पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. कासारी नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. कुंभी धरणातून एकूण 780 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु असून किरवे येथे कोल्हापूर गगनबावडा रस्तावर पाणी आल्यानं रस्ता बंद झाला आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील कोगे पूल पाण्याखाली @News18lokmat pic.twitter.com/hk9UVpkA27
— News18Lokmat (@News18lokmat) July 22, 2021
जिल्ह्यातील हे मार्ग बंद गडहिंग्लज तालुक्यामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. नीलजी आणि ऐनापूर हे दोन बंधाऱ्यावर पाणी आल्यानं वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेत. त्यातच गडहिंग्लज- चंदगड राजमार्गावर दुपारपर्यंत पाणी येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यातच कोल्हापूर- रत्नागिरी महामार्ग बंद करण्यात आला आहे. मलकापूर ते रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर येल्लुर गावाजवळ 2 फूट पाणी आल्यानं प्रशासनानं महामार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.पंचगंगा नदीच्या पुराचे पाणी कोल्हापूर शहरातल्या गायकवाड वाड्यापर्यंत पोहोचले @News18lokmat pic.twitter.com/TsoGhZ53iv
— News18Lokmat (@News18lokmat) July 22, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rain, Rain in kolhapur