मुंबई, 22 जुलै: विधानसभा निवडणूक असो वा केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार तेव्हापासून भाजपवर नाराज असलेल्या (BJP) भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भेट घेतली आहे. या भेटी दरम्यान चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पंकजा मुंडेंची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा सध्या सुरु झाली आहे. वरळीतील (Worli) गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या कार्यालयात मंगळवारी संध्याकाळी ही भेट झाली आहे. या भेटीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात खासदार प्रीतम मुंडेंचं नाव चर्चेत होतं. मात्र त्यांना मंत्रिपद न मिळाल्यानं बीड जिल्ह्यातील 80 हून अधिक पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे राजीनामे देत पंकजा मुंडेंची मुंबईत भेट घेतली होती.
त्यानंतर पंकजा मुंडेंनी समर्थकांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी भावनिक आवाहन केलं आणि कार्यकर्त्यांना आपले राजीनामे परत घेण्यास सांगितलं होतं. त्यानंतर भाजपने आयोजित केलेल्या ओबीसी आरक्षणाच्या बैठकीलाही पंकजा मुंडे गैरहजर होत्या.
दिल्लीत शेतकऱ्यांचा एल्गार, जंतर- मंतरवर आजपासून आंदोलन
या भेटीवर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मंगळवारी संध्याकाळी ही भेट झाली. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. एकाच पक्षातील दोन नेत्यांची भेट होणं स्वाभाविक आहे. यात वेगळं असं काहीच नाही. त्याचबरोबर ही भेट गुप्त नाही तर उघडपणे सर्वांसमोर झाली, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Chandrakant patil, Pankaja munde