देशात कम्युनिटी लागण झाली का? आरोग्य मंत्रालयाने केला मोठा खुलासा

देशात कम्युनिटी लागण झाली का? आरोग्य मंत्रालयाने केला मोठा खुलासा

देशात गेल्या 24 तासांमध्ये 1543 एवढे नवे रुग्ण सापडले. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या 29,435 एवढी झालीय.

  • Share this:

नवी दिल्ली 28 एप्रिल: देशात कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये दररोज वाढ होत आहे. आता देशभर लॉकडाऊन आहे आणि विदेशातून होणारी हवाई वाहतूकही बंद आहे. पण देशांतर्गत असलेल्या कोरोना रुग्णांमुळे संक्रमण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सगळ्यांना भीती आहे ती कम्युनिटी लागण झाली का याची? मात्र आरोग्य मंत्रालयाने यावर मोठा खुलासा केला आहे.

आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना याबाबतचा खुलासा केला. देशात अजुनही कम्युनिटी लागण झाल्याचे ठोस पुरावे नाहीत असं त्यांनी सांगितलं. कम्युनिटी लागण म्हणजे बाहेरून संक्रमण घेऊन आलेल्या व्यक्तिच्या संपर्कात न येताही झालेलं संक्रमण असं म्हणता येईल. यात समाजातल्या विविध घटकांना त्यांची लागण होत असते आणि त्याचा धोकाही मोठ्या प्रमाणावर वाढतो. लॉकडाऊनमुळे देशात मोठ्या प्रमाणावर नियंत्रण मिळविल्याची माहितीही त्यांनी दिली.

देशात गेल्या 24 तासांमध्ये 1543 एवढे नवे रुग्ण सापडले. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या 29,435 एवढी झालीय. तर रुग्ण बरे होण्याची प्रमाण वाढलं असून ते 23.3 टक्क्यांवर गेल्याची माहिती त्यांनी दिली. ही अत्यंत चांगली गोष्ट असल्याचंही त्यांनी सांगितलं.

हे वाचा - ...तर कोरोना त्यांच्या जीवावर बेतू शकतो, असं म्हणत राज ठाकरेंनी केली ही मागणी

नरेंद्र मोदी सरकारने कोरोनाविरुद्धची लढाई आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. रुग्णांची संख्या दररोज वाढत असली तरी परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेलेली नाही असं मत आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी व्यक्त केलंय. सरकार एका मोठ्या योजनेवर काम करत असून येत्या 31 मे पासून दररोज तब्बल एक लाख लोकांची टेस्ट केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यासाठी लागणाऱ्या टेस्टिंग किट्स या देशातच तयार केल्या जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

हे वाचा - कोरोनामुळे 30 लाखांपेक्षा जास्त बळी जाणार, 100 कोटी लोकांना लागण होण्याचा धोका

भारतात कोरोनाबाधितांची संख्या आता 29 हजारांच्या जवळ पोहोचली आहे. तर मृत्यूचा आकडाही 900च्या वर गेलाय. त्यामुळे कोरोना टेस्टिंग वाढविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. टेस्ट करण्यासाठीच्या 5 लाख किट्स सरकारने चीनमधून आयात केल्या होत्या. मात्र त्या निकृष्ट दर्जाच्या असल्याने सरकारने त्याचं कंत्राटच रद्द केलं आहे. आता अशा प्रकारच्या किट्स देशातच तयार होत आहेत. त्यासाठी ICMRची मान्यता पाहिजे असून त्याची आम्ही वाट पाहत असल्यचंही आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.

 

First published: April 28, 2020, 6:07 PM IST

ताज्या बातम्या