मराठी बातम्या /बातम्या /देश /कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये चित्ररथ नसण्याची शक्यता

कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये चित्ररथ नसण्याची शक्यता

अंतिम 14 राज्यांमध्ये यावेळी तामिळनाडू पश्चिम बंगाल केरळ या भाजप शासित नसलेल्या राज्यांचाही समावेश करण्यात आला आहे.

अंतिम 14 राज्यांमध्ये यावेळी तामिळनाडू पश्चिम बंगाल केरळ या भाजप शासित नसलेल्या राज्यांचाही समावेश करण्यात आला आहे.

अंतिम 14 राज्यांमध्ये यावेळी तामिळनाडू पश्चिम बंगाल केरळ या भाजप शासित नसलेल्या राज्यांचाही समावेश करण्यात आला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

नवी दिल्ली, 21 डिसेंबर : दरवर्षी आतुरतेनं वाट पाहणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडबाबत नवीन माहिती समोर आली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी यावेळी महाराष्ट्राचा चित्ररथ नसण्याची शक्यता आहे. अंतिम निवडीसाठी 14 राज्यांना आमंत्रण पण त्यात महाराष्ट्राचा समावेश नसल्याची माहिती समोर आली आहे.

प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व राज्यांचे चित्ररथ सादर करण्याला खूप महत्त्व मिळत आहे. हा चित्ररथ सहसा संबंधित राज्याची संस्कृती, विकास आणि कला सादर करते. हे चित्ररथ मर्यादित संख्येतच काढले जात असल्याने ते ठरविण्याचे काम एक समिती करते. पण, यंदा महाराष्ट्राला आपला चित्ररथ सादर करता येणार नसल्याची माहिती समोर आली आहे. याआधी 2020 मध्ये पण महाराष्ट्राचा चित्ररथ नव्हता. आता दोन वर्षाच्या गॅपनंतर पुन्हा महाराष्ट्राचा चित्ररथ नसणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

(Gram Panchayat Election Result : थेट माजी सरपंचांना हरवत मनसेची कोल्हापुरातल्या ग्रामपंचायतीत एन्ट्री)

अंतिम 14 राज्यांमध्ये यावेळी तामिळनाडू पश्चिम बंगाल केरळ या भाजप शासित नसलेल्या राज्यांचाही समावेश करण्यात आला आहे. मागच्या वेळी चित्ररथाचा समावेश नसल्याने तामिळनाडू आणि पश्चिम बंगालने आक्रमक भूमिका घेतलेली होती त्यामुळे यंदा या राज्यांना संधी देण्यात आली आहे.

राज्यांची संख्या अधिक पण चित्ररथ दरवेळी ठराविक संख्येतच निवडावे लागतात. त्यामुळे रोटेशन पद्धतीनुसार ही निवड होत असते. गेल्या वर्षी महाराष्ट्राने जैवविविधता आणि मानके या विषयावर चित्ररथ साकारण्यात आला होता. या चित्ररथाला लोकपसंतीमध्ये पहिला क्रमांक मिळाला होता. १९७१ ते २०२२ या काळात महाराष्ट्राने ५१ वर्षाच्या काळात ३८ वेळा चित्ररथाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या परंपरेचे दर्शन घडवले आहे. यासाठी महाराष्ट्राला १२ वेळा उत्कृष्ट चित्ररथाचा पुरस्कारही मिळाला आहे.

तज्ज्ञ समिती निवडते

चित्रकला, शिल्पकला, संगीत, स्थापत्य आणि नृत्यदिग्दर्शन या क्षेत्रातील 'प्रथितयश व्यक्तींचा' समावेश असलेली एक समिती, चित्ररथ निवडते किंवा नाकारते. प्रतिष्ठित व्यक्तींची तज्ज्ञ समिती बहु-स्तरीय प्रक्रियेत चित्ररथाची निवड करत असते.

प्रक्रिया कधी आणि कशी सुरू होते?

दरवर्षी सप्टेंबरमध्ये, संरक्षण मंत्रालय पुढील वर्षीच्या प्रजासत्ताक दिनासाठी सर्व 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय मंत्रालयांकडून चित्ररथांसाठी प्रस्ताव मागवते. या वेळी हे प्रस्ताव 10 दिवसांत पाठवण्यास सांगण्यात आले होते. प्रस्ताव आल्यानंतर ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून निवड प्रक्रिया सुरू होते.

समिती मूल्यांकन कसे करते?

तज्ज्ञ समितीच्या बैठका घेऊन चित्ररथ प्रस्तावांचे मूल्यमापन करते. प्रस्तावासोबत, राज्ये आणि केंद्रीय मंत्रालयांना स्केचेस/डिझाइन पाठवावे लागतात, ज्यांचे मूल्यांकन समितीद्वारे केले जाते. समितीला डिझाइन आवडल्यास, प्रस्तावांचे थ्रीडी मॉडेल लवकरात लवकर सादर करण्यास सांगितले जाते. मात्र, त्यानंतरही निवड निश्चित नाही. कोविडच्या निर्बंधांमुळे या वर्षी चित्ररथांची संख्या आणखी कमी झाली आहे.

(Gram Panchayat Election Result : भाजी विक्रेत्यानं केलं दिग्गजांना चित, सरपंचपदी झाली निवड!)

चित्ररथासोबत कोणतेही पारंपारिक नृत्य समाविष्ट केले असल्यास ते लोकनृत्य असावे, अशी समितीची शिफारस असते. त्यांची वेशभूषा आणि वाद्ये पारंपारिक आणि अस्सल असावीत. चित्ररथाच्या निवडीवर अंतिम शिक्कामोर्तब करण्यापूर्वी, निवड समिती त्या चित्ररथाचे दृश्य आकर्षण, तपशील आणि त्याचा जनतेवर होणारा परिणाम यांची तपासणी करते.

साधारणपणे नोव्हेंबरच्या अखेरीस किंवा डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसर्‍या आठवड्यात चित्ररथ तयार केले जातात. यावेळी ही प्रक्रिया उशिरा झाली आहे. चित्ररथ तयार करण्यासाठी राज्यांना सुमारे एक महिन्याचा कालावधी मिळतो.

First published: