मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Gram Panchayat Election Result : भाजी विक्रेत्यानं केलं दिग्गजांना चित, सरपंचपदी झाली निवड!

Gram Panchayat Election Result : भाजी विक्रेत्यानं केलं दिग्गजांना चित, सरपंचपदी झाली निवड!

कोल्हापुरात एका गावात विशेष आनंदोत्सव साजरा होत आहे. कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील अतिशय दुर्गम अशा वरेवाडी गावात एक भाजी विक्रेता थेट सरपंचपदी निवडून आला आहे.

कोल्हापुरात एका गावात विशेष आनंदोत्सव साजरा होत आहे. कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील अतिशय दुर्गम अशा वरेवाडी गावात एक भाजी विक्रेता थेट सरपंचपदी निवडून आला आहे.

कोल्हापुरात एका गावात विशेष आनंदोत्सव साजरा होत आहे. कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील अतिशय दुर्गम अशा वरेवाडी गावात एक भाजी विक्रेता थेट सरपंचपदी निवडून आला आहे.

  • Local18
  • Last Updated :
  • Kolhapur, India

    कोल्हापूर, 21 डिसेंबर : संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या ग्रामंपचायत निवडणुकीचे निकाल आता लागले आहेत. या निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला आहे. अगदी सामान्य पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांनी सरपंचपदाच्या निवडणुकीत त्यांचा पराभव केलाय. कोल्हापूर जिल्ह्यात एका निकालानं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील अतिशय दुर्गम अशा वरेवाडी गावात एक भाजी विक्रेता थेट सरपंचपदी निवडून आला आहे. आनंदा रामचंद्र भोसले असं सरपंचपदी निवडून आलेल्या उमेदवाराचं नाव आहे.

    भाजी विक्रेता ते सरपंच

    आनंदा हे शिवसेना ठाकरे गटाकडून सरपंच पदाच्या निवडणूकीसाठी उभारले होते. त्यांच्या विरोधात जन सुराज्य शक्तीचे विश्वास भोसले रिंगणात होते. या निवडणुकीत आनंदा यांना 391  तर विश्वास यांना 330 मतं मिळाली. आनंदा यांनी कोरे गटाच्या उमेदवाराचा 60 मतांनी पराभव केला.

    आनंदा हे पहिल्यापासूनच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आदर्श समोर ठेवणारे कट्टर शिवसैनिक आहेत. विजय मिळाल्याचं समजताच त्यांनी बाळासाहेबांचा फोटो उंचावून विजयाचा जल्लोष साजरा केला.  आंनदा हे सरपंच झाल्याची गोष्ट वाऱ्यासारखी पसरली.  त्यामुळे वरेवाडीसह बांबवडे पंचक्रोशीत त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

    कॉलेजची GS व्हायच्या वयात झाली गावची सरपंच, NCP अन् ठाकरे गटाच्या नुहा जावेदची मोठी चर्चा

    कोण आहेत आनंदा भोसले?

    आनंदा भोसले यांची प्रामाणिक, कष्टाळू, जिद्दी अशी सर्वत्र ओळख आहे. ते बांबवडे येथील बाजारपेठेत भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांनी पत्रकारिता क्षेत्रातील शिक्षण कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठातून पूर्ण केले आहे. हे शिक्षण घेत असताना देखील आनंदा एका हॉटेलमध्ये रुमबॉयची नोकरी करत होते. पत्रकारितेचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी स्वतःचा भाजी विक्रीचा व्यवसाय  सुरू केला. हा व्यवसाय सांभाळतच ते गावकऱ्यांच्या मदतीसाठी धावून जात. यातूनच त्यांनी भरपूर जनसंपर्क बनवला होता. यापूर्वी आनंदा उपसरपंच म्हणून देखील ते निवडून आले होते.

    First published:

    Tags: Election, Gram panchayat, Kolhapur, Local18