Ram mandir: दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघाली अयोध्या, PHOTOS पाहून बसणार नाही विश्वास!
अयोध्येतल्या 20 हजार मंदिरांची रंग रंगोटी करण्यात आली आहे. तर घाटांवर सजावट करण्यात आली आहे.
|
1/ 8
ऐतिहासिक राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी अयोध्या नगरी सज्ज झाली आहे. 5 ऑगस्टला बुधवारी मुख्य कार्यक्रम होणार आहे. यासाठी ही रामाची नगरी सज्ज झाली असून शहराचा कायापालटच झाला आहे.
2/ 8
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 ऑगस्टला भूमिपूजन होणार असून निवडक 200 लोकांनाच निमंत्रित करण्यात आलं आहे.
3/ 8
अयोध्येतली मंदिरं आणि घाट लाखो दिव्यांनी प्रकाशून गेली असून लोकांनी दिपोत्सवाला सुरुवात केली आहे.
4/ 8
अनेक मंदिरांमध्ये दिपोत्सवालाही सुरुवात झाली असून मंदिरांवर रोशनाई करण्यात आली आहे.
5/ 8
अयोध्येतल्या शरयू नदीचा काठही सजविण्यात आला आहे. नदीवरही गंगा आरती होणार आहे.
6/ 8
तर अयोध्येतल्या 20 हजार मंदिरांची रंग रंगोटी करण्यात आली आहे.
7/ 8
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं लखनऊमधलं घर सजविण्यात आलं आहे.
8/ 8
आदित्यनाथ यांनी मंगळवारी रात्री आपल्या घरातच दिप प्रज्वलन केलं आणि आतषबाजीही केली.