Home /News /national /

अख्ख्या कुटुंबाने घेतलं देशसेवेचं व्रत; कोरोना योद्ध्यांच्या अतुलनीय कार्याला सलाम

अख्ख्या कुटुंबाने घेतलं देशसेवेचं व्रत; कोरोना योद्ध्यांच्या अतुलनीय कार्याला सलाम

आपल्या मुलांना गावी ठेवून हे कोरोना योद्धा दिवस-रात्र ड्यूटीवर तैनात आहे. आठवण आली तर ते व्हिडीओ कॉलवर मुलांशी बोलतात. याचा त्यांना आधार वाटतो.

    उदयपूर, 8 मे : गेल्या 45 दिवसांपासून कोरोनाच्या (Coronavirus) संकटात लाखो कोरोना योद्धा घरापासून लांब आपल्या कर्तव्यावर आहेत. पोलिसात रुजू होण्यासाठी देशसेवेचे वेडं असावं लागतं असं म्हणतात. कोणत्याही परिस्थितीत अगदी कुटुंबापूर्वी समाजाला प्राधान्य देऊन हे वीर काम करीत आहेत. उदयपूरमधील तर अख्खं कुटुंबच देशसेवेचे अतुलनीय काम करीत आहेत. कॉन्स्टेबल सुनील मेघवाल आपली पत्नी आणि भाऊ यांच्यासह कोरोनाच्या संकटात ड्यूटीवर तैनात आहे. सुनील यांची मुलं आपल्या आजी-आजोबांसह गावी आहेत. मुलांना आई-बाबांची आठवण येते. ड्यूटीला प्राधान्य देत  कोरोनासारख्या जीवघेण्या आजारातही ते आपली ड्यूटी करीत आहेत. सुनील मेघवाल उदयपूर येथील भुपालपुरा ठाण्यात पोलिसांच्या गाडीवर ड्रायवर आहेत. गेल्या काही दिवसांपासून एक महिला कोरोनाबाधित असल्याचे आढळून आल्याने परिसर हॉटस्पॉटमध्ये आहे. येथे सुनीव मेघवाल दिवसभर गाडीतून गस्त घालत असतात. सुनील 2011 पासून पोलीस विभागात कार्यरत आहेत. सुनील मेघवाल यांची पत्नी पंकज कुमारी गेल्या दोन महिन्यांपासून आपल्या मुलांना भेटू शकली नाही. मुलांची आठवण आली तर ती व्हिडीओ कॉल करते. पंकज कुमारी हॉटस्पॉट भागात ड्यूटीवर असते. याच कुटुंबातील तिसरा सदस्य सुनील यांचा लहान भाऊ दिनेश मेघवालही उदयपूर पोलीस विभागात अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालयात सेना देत आहे. मेघवाल कुटुंबीयांनी ही प्रेरणा त्यांच्या वडिलांकडून मिळाल्याचे ते सांगतात. पाच महिन्यांपूर्वी त्यांचे वडील पोलीस विभागातून निवृत्त झाले. संबंधित -OMG! स्वतःपेक्षा 32 वर्षांनी मोठ्या असलेल्या सलमानवर या अभिनेत्रीचा जडलाय जीव आई शप्पथ हे भन्नाट आहे! लॉकडाऊनमध्ये कॅरम खेळण्याची ही पद्धत तुम्ही पाहिली का?
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या