मुंबई, 8 मे : सध्या कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. ज्यामुळे सर्वच सेलिब्रेटी त्यांच्या सिनेमांचं शूटिंग थांबवून आपापल्या घरी राहत लॉकडाऊनचं काटेकोर पालन करताना दिसत आहे. नेहमीच बीझी शेड्युलची तक्रार करणाऱ्या या सेलिब्रेटींकडे लॉकडाऊनमुळे मात्र बराच रिकामा वेळ आहे आणि त्यामुळे बरेच सेलिब्रेटी सोशल मीडियावर खूप सक्रिय झालेले पाहयला मिळत आहेत आणि त्यासोबत त्याचे जुने व्हिडीओ फोटो आणि काही रंजक किस्से सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहायला मिळत आहेत. सलमान खानबाबत सुद्धा असाच एक किस्सा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ते म्हणजे त्याच्याहून 32 वर्षांना लहान असेलेल्या एका अभिनेत्रीला चक्क सलमानशी लग्न करायचं आहे.
तसं पहायला गेलं तर सलमानचं नाव बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींशी जोडलं गेलं आहे. याशिवाय त्याचं लग्न हा बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत राहिलेला विषय आहे. आज सलमान खान 54 वर्षांचा आहे. मात्र त्याची क्रेझ अजिबात कमी झालेली नाही. त्यामुळेच की काय काही दिवसांपूर्वी एका बॉलिवूड अभिनेत्री चक्क सलमान खानशी लग्न करण्याची इच्छा एका मुलाखतीत व्यक्त केली होती. ही अभिनेत्री होती सुप्रसिद्ध अभिनेता चंकी पांडे यांची मुलगी अनन्या पांडे.
अनन्या पांडेनं मागच्या वर्षी स्टुडंट ऑफ द इयर या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हा तिचा सिनेमा फारसा चालला नाही मात्र तिच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं. याचीच पावती म्हणून तिला लगेचच कार्तिक आर्यन आणि भूमी पेडणेकर यांच्यासोबत पती पत्नी और वो या सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. या सिनेमात तिनं कार्तिकच्या प्रेयसीची भूमिका साकारली होती. दरम्यान प्रमोशच्या वेळी एका मुलाखतीत रिअल लाइफमध्ये पती म्हणून कोणता अभिनेता आवडेल असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता आणि अनन्यानं क्षणाचाही विचार न करता यावेळी सलमानचं नाव घेतलं होतं.
दरम्यान सलमान खान आता 54 वर्षांचा असला तरीही त्याच्या चाहत्यांना त्याच्या लग्नाबाबत प्रचंड उत्सुकता आहे. सध्या तो युलिया वंतूरला डेट करत आहे. मात्र लग्नाविषयी कोणताही प्रश्न विचारल्यावर सलमान या प्रश्नाचं उत्तर देणं नेहमीच टाळत आला आहे. मध्यंतरीच्या काळात तो सरोगसीच्या मदतीनं बाबा होणार असल्याच्या चर्चा सुद्धा झाल्या होत्या मात्र त्यावर सलमाननं कोणतही स्पष्टीकरण दिलं नव्हतं.
(संपादन- मेघा जेठे.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Salman khan