मराठी बातम्या /बातम्या /देश /

सुशांत सिंहच्या निधनानंतर सर्वोच्च न्यायालयाचं मोठं विधान, केंद्र सरकारकडे मागितलं उत्तर

सुशांत सिंहच्या निधनानंतर सर्वोच्च न्यायालयाचं मोठं विधान, केंद्र सरकारकडे मागितलं उत्तर

सुशांत सिंहच्या निधनानंतर अनेक विषयांवर जोरदार चर्चा सुरू आहे. यातून मोठा बदल घडण्याची शक्यता आहे

सुशांत सिंहच्या निधनानंतर अनेक विषयांवर जोरदार चर्चा सुरू आहे. यातून मोठा बदल घडण्याची शक्यता आहे

सुशांत सिंहच्या निधनानंतर अनेक विषयांवर जोरदार चर्चा सुरू आहे. यातून मोठा बदल घडण्याची शक्यता आहे

    नवी दिल्ली, 16 जून : बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर अनेक विषयांवर चर्चा सुरू आहे. त्यातील अधिक चर्चिला जाणारा विषय म्हणजे नैराश्य. अद्याप दुर्लक्षित राहिलेल्या या विषयाकडे अधिक सजगतेने लक्ष दिलं जात आहे. यानिमित्ताने मानसिक आजार, नैराश्य याविषयांवरील चर्चा तीव्र झाली आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकार आणि विमा कंपनीवर नजर ठेवणाऱ्या आयआरडीएला मानसिकरीत्या आजारी असलेल्या रूग्णांना विमा का दिला जात नाही, असा प्रश्न विचारला आहे. एक जनहित याचिकेनुसार 2017 आणि 2018 मध्ये कायद्यात संशोधन करुन मानसिक आजारांना विम्याअंतर्गत आणण्यात आले होते, असे असूनही विमा कंपनी याचे पालन करीत नाही. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला यासंदर्भात चार आठवड्यांत उत्तर मागितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुशांतसिंग राजपूत याच्या निधनानंतर तो नैराश्यात असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. आतापर्यंतच्या तपासात असे दिसून आले आहे की, तो बराच काळ मानसिकदृष्ट्या आजारी होता आणि त्याच्यावर उपचार सुरू होते. सुशांत सिंह राजपूतच्या मानसिक तणावाचे कारण काय होते, याबाबत नेमकी माहिती समोर आलेली नाही. या दरम्यान सुप्रिम कोर्टानेही केंद्र सरकारला नोटीस बजावून मानसिक रूग्ण व्यक्तींचा विमा का काढला जात नाही याबाबत उत्तर मागितले आहे. हे वाचा-दिग्दर्शकाचा सलमानवर थेट आरोप, सुशांतच्या आत्महत्येच्या निपक्षपाती चौकशीची मागणी
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Supreme court, Sushant sing rajput

    पुढील बातम्या