नेपोटिझमबाबात दिग्दर्शकाचा सलमानवर थेट आरोप, सुशांतच्या आत्महत्येच्या निपक्षपाती चौकशीची मागणी

नेपोटिझमबाबात दिग्दर्शकाचा सलमानवर थेट आरोप, सुशांतच्या आत्महत्येच्या निपक्षपाती चौकशीची मागणी

बॉलिवूड दिग्दर्शक अभिनव सिंह कश्यप यांनी सुशांतच्या आत्महत्येनंतर फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत सलमान खानवर थेट आरोप केला आहे.

  • Share this:

मुंबई, 16 जून : सध्या सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडनधील नेपोटिझमचा वाद पुन्हा एकदा उफळून आला आहे. कंगना रणौतनं सुशांतच्या निधानंतर एका व्हिडीओ शेअर केला ज्यात तिनं बॉलिवूडमध्ये होतं असलेल्या भेदभावावर भाष्य केलं होतं. त्यानंतर आता बॉलिवूड दिग्दर्शक अभिनव सिंह कश्यप यांनी याच मुद्द्यावर लक्ष वेधून घेत या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी अशी मागणी केली आहे. त्यांनी त्यांच्या फेसबुकवर याबाबत एक पोस्ट शेअर करत सलमान खान आणि त्याच्या कुटुंबावर थेट आरोप सुद्धा केला आहे.

दिग्दर्शक अभिनव सिंह कश्यप यांनी सुशांतच्या आत्महत्येची निपक्षपाती चौकशी करण्याची मागणी करत फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे. ज्यात त्यांनी लिहिलं, YRF सारख्या एजन्सींनीच कदाचित सुशांत असं टोकाचं पाऊल उचलण्यास भाग पाडलं. त्यामुळे या प्रकरणाची या अँगलनं चौकशी व्हायला हवी. या एजन्सी कलाकारांचं करिअर बनवत नाही तर बिघडवण्याचं काम करतात. मी स्वतः याचा अनुभव घेतला आहे. हा अलिखित कोड ऑफ कंडक्ट आहे. या एजन्सी कलाकारांना साइन केल्यानंतर आपली ती मनमानी करतात.

दबंग मेकिंगच्यावेळी माझ्यासोबतही काहीसं असंच घडलं होतं

अभिनव यांनी त्याच्या पोस्टमध्ये त्यांचा स्वतःचा अनुभव शेअर केला होता. त्यांनी लिहिल, दबंग मेकिंगच्या वेळी माझ्यासोबतही हे सर्व घडलं आहे. त्यावेळी अरबाज खान, सोहेल खान आणि त्याच्या कुटुंबीयांनी फक्त मला घाबरवलं, धमकावलं नाही तर त्यांनी माझं करिअर कंट्रोल करण्याचाही प्रयत्न केला. अरबाज माझा दबंग नंतर दुसऱ्या सिनेमाचा प्रोजेक्ट सुद्धा आपल्या फॅमिली पावरचा वापर करून माझ्याकडून काढून घेतला होता. ज्यामुळे माझं खूप नुकसान झालं होतं. दबंगच्या रिलीजच्या वेळी माझी नकारात्मक प्रतिमा तयार करण्यात आली आणि माझी नकारात्मक पब्लिसिटी केली गेली.

वेगवेगळ्या नंबरवरून आल्या धमक्या

अभिनव यांनी त्यांच्या पोस्टमध्ये पुढे लिहिलं, माझ्या पर्सनल लाइफमध्ये अनेक चढ-उतार आले पण हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही. मला वेगवेगळ्या नंबरवरून धमकी देण्यात आली. मी त्यावेळी पोलीसांत तक्रार सुद्धा केली होती. अभिनवनं त्याच्या पोस्टमध्ये जे लोक आपली मनमनी करून कलाकारांनी असं वर्तन करतात. त्यांचा पर्दाफाश करणं गरजेच आहे आणि यात सर्वात मोठी व्यक्ती आहे ती म्हणजे सलमान खान असं म्हणत सलमानवर थेट आरोप केले आहेत.

First published: June 16, 2020, 11:41 AM IST

ताज्या बातम्या