बरेली, 20 मे : उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये ऑनर किलिंगचा प्रकार उघडकीस आला आहे. येथे आतंरजातीय प्रेमविवाह केल्याने एका पित्याने आपल्या लेकीची अत्यंत क्रुरपणे हत्या केल्याचे समोर आले आहे. या मुलीच्या वडिलांनी व काकांनी तिचा गळा कापून हत्या केली आणि मृतदेह रामगंगा नदीत फेकून दिला. आपणचं लेकीचा खूण केल्याची माहिती या मुलीचे वडील व काकाने दिली. पोलिसांनी तातडीने त्यांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अटक झाल्यानंतर दोन्ही आरोपींनी मीडियासमोर आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. ते म्हणाले, आम्ही नीलमला रामपुरहून शाहबाजपुरला पुलावर आणलं. येथे तिच्या गळ्यावर सुरा चालविला आणि त्यानंतर तिला रामगंगा नदीत फेकून दिले. नीलमचे पती शत्रुघ्न प्रजापती यावर म्हणाले की, नीलम पाली समाजातील आहे. मात्र तिच्या कुटुंबीयांचा आमच्या लग्नाला विरोध होता. त्यामुळे लग्नानंतर आम्ही दुसऱ्या शहरात जाऊन राहत होतो. मात्र लॉकडाऊनमुळे आम्ही पुन्हा गावी आलो होतो. त्यानंतर नीलमचे वडील व काका तिला जबरदस्तीने मारत घरी घेऊन गेले व तिची हत्या केली. नीलम ही शत्रुघ्नच्या शेजारीच राहत होती. तीन महिन्यांपूर्वीच याचं लग्न झालं होतं. कुटुंबीयांचा विरोध असल्याने ते दुसऱ्या शहरात जाऊन गुण्यागोविदांने राहत होते. लॉकडाऊनमध्ये ते गावी परतले आणि हा घात झाला. सध्या देशभरात कोरोनाचा कहर वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. शहरातील व्यवसाय ठप्प झाल्याने हे नवदाम्पत्य गावी परतले होते. संबंधित- कोरोनामुक्त रुग्ण पुन्हा कोरोनाग्रस्त झाल्यास त्याच्यामार्फत व्हायरस पसरतो का? आदित्य ठाकरे आणि भाजप नेत्यात जुंपली, राष्ट्रीय वाद पोचला वैयक्तीक पातळीवर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.