नवी दिल्ली 16 मे : देशात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढत आहे. बाधितांच्या संख्येने 80 हजारांचा आकडा पार केल्याने सरकारची चिंता वाढली आहे. त्यातच लॉकडाऊनमध्ये सुट मिळत असल्याने लोक आता जास्त प्रमाणात घराबाहेर येत आहेत. तर शहरांमधून मजूर लाखोंच्या संख्येने गावाकडे परतत असल्याने सरकारची चिंता आणखी वाढली आहे. देशातलं एक मोठं राज्य असलेल्या बिहारमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे त्यामुळे राज्य सरकार हादरून गेलं आहे. राज्यातल्या कोरोनाबाधितांची संख्या आता 1200च्या जवळ गेली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यत परतलेल्या 650 मजुरांच्या टेस्ट या पॉझिटिव्ह निघाल्या आहेत. तर आणखी दोन हजार रिपोर्ट्स येणं बाकी आहे. गेल्या काही दिवसांमध्ये बिहारमध्ये इतर राज्यांमधून तब्बल 3 लाखांपेक्षा जास्त मजूर परतले असून अजुनही मजुरांचा ओघ सुरूच आहे. त्यामुळे बिहार सरकारची चिंता वाढली आहे. बिहारमध्ये आरोग्य विभागाची परिस्थिती अतिशय वाईट आहे. पायाभूत सुविधांची कमतरता आहे त्यामुळे भविष्यात संख्या वाढली तर काय करायचं याची सरकारला चिंता आहे. आत्तापर्यंत कोरोना आटोक्यात आहे. मात्र शहरांमधून परतणाऱ्या मजुरांच्या माध्यमातून तो ग्रामीण भागात जर पसरला तर काय करायचं असा प्रश्न सरकारला पडलाय. त्यामुळे पुढचे दोन दिवस हे कसोटीचे असणार आहेत. त्या काळात जर कोरोनाला रोखण्यात यश मिळालं तर भारतात परिस्थिती आटोक्यात राहिल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केलाय. तर अनेक शहरांमध्ये मजुरांचा उद्रेक होत असल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे. पोलिसांना पाहून मास्क नसलेल्या तरुणाने तोंडावर लावली दहाची नोट लॉकडाऊन वाढतच असल्याने देशभर अडकलेल्या लाखो मजुरांना आपल्या घराकडे जायचं आहे. अनेक जण पायीच निघाले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून हे सत्र सुरूच आहे. मात्र काही दिवसांपूर्वीच सरकारने देशातल्या अनेक शहरांमधून मजुरांसाठी श्रमिक ट्रेन्स सुरू केल्या आहेत. त्यामुळे सगळ्यांना एक आशा निर्माण झाली होती. मात्र गुजरातमधल्या राजकोटमधून निघणाऱ्या दोन ट्रेन्स रद्द झाल्याने या मजुरांनी तुफान राडा केला. शेवटी पोलिसांना अश्रूधुराचा वापर करावा लागला. गाड्या असल्यामुळे आपण आता घरी जावू अशी आस सगळ्या मजुरांना लागली होती. मात्र काही कारणांमुळे राजकोटहून बिहार आणि उत्तर प्रदेशात जाणाऱ्या दोन ट्रेन्स रद्द झाल्या. ही माहिती पसरताच या मजुरांचा संयम सुटला आणि त्यांनी तोडफोड करायला सुरूवात केली. काही मजूर हे रेड झोनमधले बॅरेकेट्स काढत असल्याने पोलिसांना लाढीमार करावा लागला. Breaking कोरोनाला रोखण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय; देशभरात 31 मेपर्यंत लॉकडाऊन संतप्त मजुरांनी गाड्या आणि दुकानांची तोडफोड केली. जमावाला पांगविण्यासाठी शेवटी पोलिसांनी अश्रूधुराची नळकांडी फोडली. तेव्हा कुठे जमाव शांत झाला. आता पुन्हा लॉकडाऊन वाढल्याने या मजुरांना थोपवणं हे प्रशासनापुढचं आव्हान ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.