नवी दिल्ली**, 17 मे :** कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) प्रसार रोखण्यासाठी देशात राबवण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या (Lockdown) तिसर्या टप्प्यातील आज शेवटचा दिवस आहे. लॉकडाऊन असूनही, देशात कोरोना विषाणूची प्रकरणं झपाट्यानं वाढत आहेत. अशा परिस्थितीत देशभरातील लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारनंही (Tamil Nadu Government) 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली आहे. या काळात राज्यात निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. यानंतर आज नॅशनल डिसास्टर मॅनेजमेंट ऑथोरिटीने संपूर्ण देशभरात 31 मेपर्यंत लॉकडाऊनची मर्यादा वाढविण्यात आल्याचे परिपत्रक जारी केलं आहे.
Coronavirus lockdown extended till May 31: NDMA
— Press Trust of India (@PTI_News) May 17, 2020
National Disaster Management Authority (NDMA) asks Ministries/ Departments of Government of India, State Governments and State Authorities to continue the lockdown measures up to 31st May 2020. pic.twitter.com/tn0i85kVSK
— ANI (@ANI) May 17, 2020
नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथोरिटी (NDMA) याबाबत परिपत्रक जारी केलं आहे. त्यानुसार भारत सरकारअंतर्गत येणाऱ्या विविध विभाग आणि राज्य सरकारांना लॉकडाऊनची नियमावली 31 मेपर्यंत सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली होती. ते म्हणाले की, हा टप्पा आतापर्यंतच्या तीन लॉकडाऊनपेक्षा पूर्णपणे वेगळा आणि अधिक सवलतींचा असेल. त्याअंतर्गत, आज गृह मंत्रालयाकडून मार्गदर्शक तत्त्वं जारी होण्याची अपेक्षा आहे. महाराष्ट्र (Maharashtra) सरकारनेही लॉकडाऊन कालावधी 31 मे पर्यंत वाढवला आहे. राज्य सरकारने 17 मे रोजी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. केंद्र शासनाने आपत्ती अधिनियम 2005 अंतर्गत लॉकडाऊन कालावधी 17 मेपर्यंत वाढवला होता. हा कालावधी आज संपला असून आता पुढे लॉकडाऊनचा चौथा टप्पा लागू करण्यात आला आहे. संबंधित- कोरोनाचा उद्रेक असतानाच बेस्ट संपाचा धोका, राज्यातून 1000 बसेस मुंबईत आणणार