जाहिरात
मराठी बातम्या / देश / पोलिसांना पाहून मास्क नसलेल्या तरुणाने तोंडावर लावली दहाची नोट, अडवल्यानंतर फाडली पावती

पोलिसांना पाहून मास्क नसलेल्या तरुणाने तोंडावर लावली दहाची नोट, अडवल्यानंतर फाडली पावती

पोलिसांना पाहून मास्क नसलेल्या तरुणाने तोंडावर लावली दहाची नोट, अडवल्यानंतर फाडली पावती

लॉकडाऊनच्या काळात दुचाकीने रस्त्यावरून जात असताना मास्क नव्हता म्हणून पोलिसांपासून वाचण्यासाठी तोंडावर चक्क दहा रुपयांची नोट चिकटवली होती.

  • -MIN READ
  • Last Updated :

मेरठ, 17 मे : कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लॉकडाऊनच्या काळात लोकांना घरीच राहण्यास सांगण्यात आलं आहे. मात्र तरीही काही लोक घरातून बाहेर पडत लॉकडाऊनचं उल्लंघन करत आहेत. शनिवारी उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये पोलिसांनी दोन तरुणांविरुद्ध एफआय़आर दाखल केला. दोन्ही तरुणांनी चेहऱ्यावर मास्क घातला नव्हता. त्यातील एकाने मास्क नव्हता म्हणून पोलिसांपासून वाचण्यासाठी तोंडावर चक्क दहा रुपयांची नोट चिकटवली होती. लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावर  फिरणाऱ्या वाहनधारकांचे चेकिंग सुरू होते. नौचंडी भागातील एल ब्लॉक चौकत हे चेकिंग सुरू होतं. यावेळी पोलिसांना दुचाकीवरून दोन तरुण येताना दिसले. यातील एकाने त्याच्या चेहऱ्यावर रुमाल बांधला होता. तर दुसऱ्याकडे मास्क किंवा रुमाल यापैकी काहीच नव्हते. पोलिसांना पाहताच तरुणाने खिशातून दहाची नोट काढली. ती तोंडावर अशी लावली की मास्क घातला आहे असं वाटावं. मात्र पोलिसांनी दोघांना अडवलं. त्यांची चौकशी केली असता एकाने त्याचं नाव आमिर असं सांगितलं तर दुसऱ्याने महबूब सांगितलं. हे वाचा : चिरीमिरी घेऊन दिला जातोय या जिल्ह्यात प्रवेश, ‘स्टिंग’मध्ये लाचखोरीचा पर्दाफाश दोन्ही तरुण लिसाडी गेट भागातील झाकीर कॉलनीत काम करतात. या तरुणांनी सांगितलं की, दोघेही ठेकेदाराकडे पैसे आणण्यासाठी जात होते. पोलिसांनी तरुणांच्या गाडीची पावती फाडली कारण त्यांच्याकडे हेल्मेट नव्हतं. त्यानंतर दोन्ही तरुणांना पोलिसांनी मास्कही दिला. हे वाचा : Lockdown मुळे बायको माहेरीच अकडली, पतीने मुलांसमोर मावस बहिणीशी थाटला विवाह

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात