Unlock 4.0ची तयारी सुरू, शाळा बंदच राहणार; जाणून घ्या नव्या नियमांबद्दल

Unlock 4.0ची तयारी सुरू, शाळा बंदच राहणार; जाणून घ्या नव्या नियमांबद्दल

प्रवासी आणि माल वाहतुकीवरची बंधन उठवा असा सल्ला केंद्राने सर्वच राज्य सरकारांना नुकताच दिला होता.

  • Share this:

नवी दिल्ली 24 ऑगस्ट: Unlock 3 संपयला आता काही दिवसच राहिले असून Unlock 4.0ची प्रक्रिया सुरु झाली आहे. 30 ऑगस्टपर्यंत या अनलॉकची मुदत असून महिन्याच्या शेवटी नवे नियम जाहीर होण्याची शक्यता आहे. या अनलॉक 4.0मध्ये शाळा आणि कॉलेजेस बंदच राहणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या टप्प्यात मेट्रो सेवेला मंजूरी मिळू शकते अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. गृहमंत्रालय याबाबतील लवकरच मार्गदर्शक सूचना जारी करणार आहे. या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्य सरकारे निर्णय घेत असतात.

प्रवासी आणि माल वाहतुकीवरची बंधन उठवा असा सल्ला केंद्राने सर्वच राज्य सरकारांना नुकताच दिला होता.

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी केंद्र सरकारने आता सर्व व्यवहार सुरळीत सुरु ठेवण्यासाठी कंबर कसली आहे. देशात सध्या Unlock 3 सुरु आहे. त्यासाठीची मार्गदर्शक तत्वेही केंद्राने जारी केली होती. मात्र या मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी केंद्र सरकारल्या मिळाल्या आहेत. त्यामुळे केंद्राने सर्व राज्य सरकारांना पत्र पाठवून फटकारलं असून प्रवासी आणि माल वाहतुकीवरचे निर्बंध उठविण्याचे निर्देश दिले आहेत.

‘राजकारणातून गांधी-नेहरू परिवाराचं अस्तित्व संपलं’ काँग्रेसवर भाजपची टीका

केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी यासंदर्भात सर्व राज्यांना पत्र पाठवली आहेत. त्यात त्यांनी हे सर्व निर्बंध हटविण्याची मागणी केलीय. या निर्बंधांमुळे मालाच्या पुरवढ्यावर प्रतिकूल परिणाम झाले आहे. त्याचा परिणाम आर्थिक व्यवहांवर झाला आहे. त्यामुळे हे निर्बंध हटविण्यात यावेत असंही त्यात म्हटलं आहे.

महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये वाहतूकीवर अनेक निर्बंध आहेत. अजुनही जिल्हाबंदी कायम आहे. तर राज्यांमधली वाहतूक सुरु झालेली नाही. त्यामुळे अनेक उद्योगांना मालाचा पुरवढा सुरळीत होऊ शकलेला नाही.

काँग्रेसच्या राजकीय नाट्यात अहमद पटेलांची एण्ट्र, राहुल गांधींसाठी मोर्चेबांधणी

मात्र वाढणारी गर्दी लक्षात घेता आंतरजिल्हा वाहतूक सुरु करण्याबाबत राज्यात विचार करण्यात येत आहे. अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच घेतील असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं होतं.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 24, 2020, 6:16 PM IST

ताज्या बातम्या