काँग्रेसच्या राजकीय नाट्यात अहमद पटेलांची एण्ट्री, राहुल गांधींसाठी सुरू झाली मोर्चेबांधणी

काँग्रेसच्या राजकीय नाट्यात अहमद पटेलांची एण्ट्री, राहुल गांधींसाठी सुरू झाली मोर्चेबांधणी

काँग्रेसच्या एका गटाला राहुल गांधी अध्यक्ष व्हावेत असं वाटतं तर दुसरा गट सोनिया गांधी यांच्यासाठी आग्रही आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 24 ऑगस्ट: काँग्रेस कार्यसमितीची आजची बैठक वादळी ठरली आहे. सोनिया गांधी यांचा राजीनाम्याचा प्रस्ताव. त्यानंतर राहुल गांधी यांचं कथित वक्तव्य आणि त्यानंतर सुरु झालेली चर्चा यामुळे दिल्लीचं वातावरण तापलं आहे. काँग्रेसच्या एका गटाला राहुल गांधी अध्यक्ष व्हावेत असं वाटतं तर दुसरा गट सोनिया गांधी यांच्यासाठी आग्रही आहे. या सगळ्या नाट्यात आता ट्रबल शुटर समजले जाणारे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांची एण्ट्री झाली असून त्यांनी राहुल गांधी यांच्यासाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

राहुल यांनीच पक्षाचं अध्यक्षपद स्वीकारावं असा आग्रह त्यांनी धरल्याची माहिती दिली जातेय. त्यामुळे आता पक्षाच्या धोरणाची पुढची दिशा ठरण्याची शक्यता आहे. सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार असलेले अहमद पटेल हे काँग्रेसचे चाणक्य समजले जातात.

राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे ज्येष्ठ नेते नाराज झाले आहेत. नंतर राहुल गांधी यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलेलंच नव्हतं असं त्यांनी सांगितल्याने मी माझं ट्विट डिलिट केल्याचं कपील सिब्बल यांनी म्हटलं होतं.

काँग्रेसचा नवा अध्यक्ष हा गांधी कुटुंबाबाहेरचा असावा असं राहुल गांधी यांचं  मत असल्याचंही सांगितलं जातं आहे. मात्र असा प्रयोग आत्तापर्यंत फारसा चालला नाही. त्यामुळे राहुल गांधी यांनीच अध्यक्षपद स्वीकारत पक्षाला दिशा द्यावी असं काही नेत्यांच मत आहे. त्यामुळे आता पडद्यामागून अहमद पटेल हे सूत्र सांभाळतील असं बोललं जात आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 24, 2020, 3:36 PM IST

ताज्या बातम्या