‘राजकारणातून गांधी-नेहरू परिवाराचं अस्तित्व संपलं’ काँग्रेसच्या नाट्यावर भाजप नेत्याचं वक्तव्य

‘राजकारणातून गांधी-नेहरू परिवाराचं अस्तित्व संपलं’ काँग्रेसच्या नाट्यावर भाजप नेत्याचं वक्तव्य

'काँग्रेस पक्षाला विदेशी नाही तर स्वदेशी गांधींची गरज आहे. विदेशी गांधीमुळे पक्षाचं भलं होणार नाही.'

  • Share this:

नवी दिल्ली 24 ऑगस्ट: काँग्रेसमधल्या अध्यक्षपदाच्या नाट्याने दिल्लीतलं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. काग्रेस कार्यसमितीच्या वादळी बैठकीत आरोप-प्रत्यारोप झाल्याने चर्चेला उधाण आलं आहे. हीच संधी साधत भाजप नेत्यांनी काँग्रेसवर शरसंधान करायला सुरुवात केली आहे. भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. आता राजकारणातून नेहरु आणि गांधी घराण्याचं अस्तित्व संपलं अशी टीका उमा भारती यांनी केलीय.

उमा भारती म्हणाल्या, काँग्रेसमध्ये जे काही सुरू आहे त्यामुळे पक्षाची स्थिती दिसून येते. पक्षाने आणि खऱ्या गांधी वादाकडे गेलं पाहिजे. पक्षाला विदेशी नाही तर स्वदेशी गांधींची गरज आहे. विदेशी गांधीमुळे पक्षाचं भलं होणार नाही असंही त्या म्हणाल्या. उमा भारती यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

काय झालं काँग्रेसमध्ये?

काँग्रेस कार्यसमितीची आजची बैठक वादळी ठरली आहे. सोनिया गांधी यांचा राजीनाम्याचा प्रस्ताव. त्यानंतर राहुल गांधी यांचं कथित वक्तव्य आणि त्यानंतर सुरु झालेली चर्चा यामुळे दिल्लीचं वातावरण तापलं आहे. काँग्रेसच्या एका गटाला राहुल गांधी अध्यक्ष व्हावेत असं वाटतं तर दुसरा गट सोनिया गांधी यांच्यासाठी आग्रही आहे.

या सगळ्या नाट्यात आता ट्रबल शुटर समजले जाणारे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांची एन्ट्री झाली असून त्यांनी राहुल गांधी यांच्यासाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

राहुल यांनीच पक्षाचं अध्यक्षपद स्वीकरावं असा आग्रह त्यांनी धरल्याची माहिती दिली जातेय. त्यामुळे आता पक्षाच्या धोरणाची पुढची दिशा ठरण्याची शक्यता आहे. सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार असलेले अहमद पटेल हे काँग्रेसचे चाणक्य समजले जातात.

राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे ज्येष्ठ नेते नाराज झाले आहेत. नंतर राहुल गांधी यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलेलंच नव्हतं असं त्यांनी सांगितल्याने मी माझं ट्विट डिलिट केल्याचं कपील सिब्बल यांनी म्हटलं होतं.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 24, 2020, 5:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading