जाहिरात
मराठी बातम्या / देश / नर्सने मृत बाळाला बापाकडे सोपवलं; दफन करताना रडण्याच्या आवाजाने कुटुंबीय हैराण

नर्सने मृत बाळाला बापाकडे सोपवलं; दफन करताना रडण्याच्या आवाजाने कुटुंबीय हैराण

नर्सने मृत बाळाला बापाकडे सोपवलं; दफन करताना रडण्याच्या आवाजाने कुटुंबीय हैराण

दफन करण्यापूर्वीच बाळाच्या रडण्याच्या आवाजाने सर्वांना धक्काच बसला.

  • -MIN READ
  • Last Updated :

उदयपूर, 9 जुलै : वैद्यकीय कर्मचाऱ्य़ांना देवाचा दर्जा दिला जातो. कोरोनाच्या या महासाथीत रुग्णसेवा करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्य़ांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर देशभरातील सर्व नागरिकांनी थाळ्या वाजवून त्यांचे कौतुक केलं. मात्र वैद्यकीय कर्मचाऱ्य़ांचं दुर्लक्ष किती मोठं संकट उभं करु शकतं याचा आपण विचारही करू शकत नाही. ही घटना उदयपूरातील गोगुंदाजवळील पडाली पीएचसी येथील आहे. येथे एका नर्सने जिवंत नवजात बाळाला मृत सांगून कुटुंबीयांकडे सोपवलं. कुटुंबीयांनीही बाळाला मृत मानून तिला दफन करण्यासाठी घेऊन गेले. दफन करण्यापूर्वीच बाळाच्या रडण्याच्या आवाजाने सर्वांना धक्काच बसला. हे वाचा- काँग्रेस नेता अहमद पटेल यांच्या घरी पोहोचली ईडी; चौथ्यांदा झाली चौकशी येथे पडाली पीएचसीमध्ये ललिता नावाच्या एका महिलेची प्रसुती झाली. नर्स गंगाने नवजात बाळाला तपासले आणि मृत घोषित केले. त्यानंतर महिलेच्या सासुला याबाबतची माहिती दिली. त्यानंतर महिलेचे कुटुंबीय बाळाला दफन करण्यासाठी घेऊन जात होते. तेव्हा बाळाच्या आवाजाने सर्वजण हैराण झाले. हे वाचा- CBSE बोर्डाच्या परीक्षांची बातमी Fake; 11 जुलै रोजी लागणार नाही निकाल सर्व कुटुंबीय आनंदीत झाले. रुग्णालयात जेव्हा बाळ मृत असल्याची माहिती कुटुंबीयांना आणि बाळाच्या आईला देण्यात आली होती, तेव्हा सर्वजण रडून रडून बेजार झाले होते. बाळ जिवंत असल्याचे कळताच सर्वजण खूष झाले. मात्र या प्रकणात नर्सचा निष्काळजीपणा दिसून आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात