नवी दिल्ली**, 9** जुलै : काँग्रेसचे वरिष्ठ नेता अहमद पटेल यांची चौथ्यांदा अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली आहे. गुरुवारी ईडीने संदेसरा बंधू बँक घोटाळा आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अहमद पटेल यांची चौकशी केली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली. ईडीचे तीन सदस्यीय दल राज्य सभा खासदार असलेल्या 23, मदर टेरेसा क्रीसेंट निवासस्थानी सकाळी 11 वाजता पोहोचली. यापूर्वी 70 वर्षीय अहमद पटेल याच्यांशी 2 जुलै रोजी सुमारे 10 तास चौकशी करण्यात आली होती. त्यांनी सांगितले की ईडीच्या तपास यंत्रणांनी त्यांना तीन सत्रांमध्ये 128 प्रश्न विचारले आहेत. हे वाचा- शिवसेनेत घडामोडींना वेग, मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्व मंत्र्यांची तातडीची बैठक पटेल म्हणाले होते की, हा माझा आणि माझ्या कुटुंबीयांविरूद्ध राजकीय छळ केला जात आहे. आतापर्यंत, ईडीने 27 जून, 30 जून आणि 2 जुलै रोजी झालेल्या अधिवेशनात काँग्रेसच्या कोषाध्यक्षांची 27 तास चौकशी केली. हे वाचा- परीक्षा रद्दच! UGC ने दिलेल्या निर्णयानुसार सप्टेंबरपर्यंत परीक्षा अशक्य- सामंत कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे ज्येष्ठ नागरिकांनी बाहेर जाऊ नये म्हणून मार्गदर्शक सूचना देऊन पटेल यांनी ईडी कार्यालयात जाण्याची परवानगी नाकारली, त्यानंतर त्यांना घरी चौकशी करण्याची परवानगी देण्यात आली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, काँग्रेस नेत्यांची विधाने प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अॅक्ट (पीएमएलए) अंतर्गत नोंदविण्यात येत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.