जाहिरात
मराठी बातम्या / देश / CBSE बोर्डाच्या परीक्षांची बातमी Fake; 11 जुलै रोजी लागणार नाही निकाल

CBSE बोर्डाच्या परीक्षांची बातमी Fake; 11 जुलै रोजी लागणार नाही निकाल

CBSE बोर्डाच्या परीक्षांची बातमी Fake; 11 जुलै रोजी लागणार नाही निकाल

15 जुलै किंवा त्यापूर्वी सीबीएसई परीक्षांची तारीख जाहीर होणार असल्याचे सांगितले जात आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 9 जुलै : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (Central Board of Secondary Education, CBSE) दहावी, बारावीच्या निकालाची तारीख जाहीर केल्याची बातमी काही वेळापूर्वी समोर आली होती. मात्र ही बातमी खोटी असल्याची माहिती समोर येत आहे. सीबीएसई बोर्डाच्या परीक्षाबाबतची एक प्रेस रिलिज समोर आली होती. ज्यामध्ये  बारावीचा निकाल 11 जुलै रोजी जाहीर होणार असून दहावीचा निकाल 13 जुलैला जाहीर होणार असल्याचे नमूद केले आहे. मात्र ही बातमी खोटी असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत एएनआयने ट्विट करुन माहिती दिली आहे.

जाहिरात

26 जून रोजी सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार 15 जुलैपूर्वी सीबीएसईने परीक्षांचा निकाल जाहीर करणार असल्याचे सांगितले होते. मात्र त्यासंदर्भात नेमकी तारीख जाहीर केली नव्हती. हे वाचा- #CBSESyllabus मधून धर्मनिरपेक्षता विषय हटविण्याबाबत HRD मंत्र्यांचा खुलासा आज सीबीएसईच्या नावाने एक प्रेस रिलिज समोर आली आहे. मात्र ही बातमी फेक असल्याचे बोर्डाच्यावतीने सांगितले जात आहे. अद्यापही सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांचा निकाल जाहीर करण्यासाठी तारीख ठरविण्यात आली नसल्याचे समोर येत आहे. दरम्यान पुढील वर्षी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) बोर्डाच्या परीक्षेतून धर्मनिरपेक्षता, राष्ट्रवाद, नागरिकत्व, नोटाबंदी आणि लोकशाही हक्कांबाबतचे विषय हटविण्यात आले आहेत. या विषयांशी संबंधित प्रकरणं आणि इतर अनेक विषय अभ्यासक्रमातून काढण्यात आले आहे. अभ्यासक्रमात या विषयासंबंधित साहित्य हटविल्यानंतरच्या विवादात केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी गुरुवारी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात