कोरोना संशयित जोडपे सार्वजनिक कार्यक्रमात झाले सहभागी, लोकांच्या पोटात भीतीचा गोळा

हे जोडपे याआधी सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले असल्याने इतर नागरिकांची चिंता वाढली आहे.

हे जोडपे याआधी सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले असल्याने इतर नागरिकांची चिंता वाढली आहे.

  • Share this:
    चंद्रपूर, 14 मार्च : सिंदेवाही तालुक्यातील एका गावात कोरोना संशयित जोडप्याच्या वास्तव्यावरून खळबळ उडाली आहे. यातील पुरुष नुकताच सौदी अरबचा दौरा करून परतला आहे. सध्या दोघांचीही प्रकृती आहे बिघडली आहे. या स्थितीत दोघेही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यामुळे लोकांमध्ये काहीसं भीतीचं वातावरण निर्माण झालं. या सर्व प्रकरणाची गावात चर्चा झाल्यावर आरोग्य विभागाने दखल घेतली. रुग्णवाहिकेद्वारे संबंधित जोडप्याला आणण्यात येत आहे. या दोघांनाही चंद्रपूर जिल्हा रुग्णालयातील कोरोना उपचार कक्षात दाखल केले जाणार असल्याची माहिती आहे. मात्र हे जोडपे याआधी सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले असल्याने इतर नागरिकांची चिंता वाढली आहे. दरम्यान, राज्यातल्या कोरोनाग्रस्तांची (covid-19) संख्या वाढली आहे. आता देशात सर्वाधिक coronavirus चे रुग्ण महाराष्ट्रात आहेत. मुंबई, नवी मुंबई आणि यवतमाळमध्ये नवे रुग्ण सापडल्याने राज्यातल्या बाधितांची संख्या वाढली आहे. त्यातच आता एका टूर कंपनीसोबत परदेशात जाऊन आलेल्या व्यक्तीच्या पाच नातेवाईकांना कोरोना झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 31 वर पोहोचली आहे. कोरोना संदर्भात खबरदारीचा पर्याय म्हणून सगळ्या शाळा बंद करण्यात आल्या आहेत. यात राज्यातल्या सरकारी आणि खासगी सर्व शाळांचा समावेश आहे. येत्या 31 मार्चपर्यंत राज्यातील सर्व शाळा बंद राहतील, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधानसभेत सांगितलं. कायदा लागू कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) वाढता धोका पाहता केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. कोविड-19 ला आपत्ती घोषित केलं आहे. कोरोनाव्हायरसमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या कुटुंबाला 4 लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय साथरोग प्रतिबंध कायदाही लागू करण्यात आला आहे. हेही वाचा- Corona ची 'आपत्ती' - कायदा मोडणाऱ्यांना तुरुंगवास; मृतांच्या कुटुंबांना मिळणार 4 लाख सरकारने कोरोनाव्हायरसला आपत्ती (Notified Disaster) घोषित केलं आहे. ज्यामुळे कोरोनाव्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाला मदत मिळू शकेल. राज्याच्या डिजास्टर रिस्पॉन्स फंडमार्फत (Disaster Response Funds - SDRF) मदत म्हणून निधी दिला जाईल. कोरोनाव्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांचा कुटुंबाला प्रत्येकी 4 लाख रुपये मिळतील. यामध्ये कोरोनाव्हायरसचे रुग्ण आणि या रुग्णांची देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्याही कुटुंबाचा समावेश आहे.
    First published: