लॉकडाऊनमधील सर्वात वेदनादायक कहाणी, बापानेच 8 महिन्यांच्या बाळाची निर्घृणपणे केली हत्या

लॉकडाऊनमधील सर्वात वेदनादायक कहाणी, बापानेच 8 महिन्यांच्या बाळाची निर्घृणपणे केली हत्या

ही घटना अंगावर काटा आणणारी आहे. बापानेच पोटच्या लेकीची अत्यंत क्रुरपणे हत्या केली

  • Share this:

मिर्झापूर, 8 मे : मुलीचं आणि वडिलांचं नातं अनोखं असतं. अगदी दोघांमध्ये टोकाचं भांडण होत असलं तरी मुलीवर बाप जीवापाड प्रेम करीत असतो. मात्र लॉकडाऊनमध्ये एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. ही घटना जनपदमधली आहे. घरगुती वादातून आपल्याच पोटच्या लेकीला अत्यंत क्रुरपणे मारणाऱ्या बापाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार मिर्झापूरमधील लालगंज तहसील क्षेत्रातील राजापुर गावात आरोपी आपल्या पत्नीला माहेराहून आणायला गेला होता. मात्र माहेरच्या नातेवाईकांनी त्याच्या पत्नीला पाठविण्यास नकार दिला. त्यानंतर बापाने 8 महिन्यांच्या मुलीला आईच्या हातातून हिसकावून घेतले जमिनीवर फेकलं. यानंतर मुलगी ओक्साबोक्सी रडायला लागली. तिच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती. पत्नीच्या नातेवाईकांनी तातडीने तिला रुग्णालयात हलविले. मात्र रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

बायकोला नेण्यासाठी ते तिच्या माहेरी आला होता. मात्र यावरुन पत्नीचे कुटुंबीय व त्यांच्यामध्ये वाद झाला. आणि रागाच्या भरात त्याने मुलीला जमिनीवर फेकले. मुन्नालाल असं या व्यक्तीचं नाव आहे. मुन्नालालने बाळाला जमिनीवर फेकून मारलं असा आरोप पत्नीच्या माहेरच्यांकडून  केला जात आहे. याबाबत लालगंज ठाण्याचे प्रभारी हरीश चंद्र सरोज यांनी सांगितले की मुन्नालाल यांच्या सासऱ्यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. वैष्णवी या 8 महिन्याच्या मुलीला जमिनीवर फेकल्याने तिच्या डोक्याला गंभीर जखम झाली व त्यात तिचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यानंतर पोलिसांनी मुन्नालाल याला ताब्यात घेतले आहे.

संबंधित -'रोजापेक्षा 4 वर्षांच्या दीक्षाचा जीव महत्त्वाचा', वकारने तोडला रमझानचा उपवास

नराधमांनी अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन नेलं जंगलात, आणि...

 

 

 

First published: May 8, 2020, 9:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading