टोंक (राजस्थान) 8 मे: देशात कोरोनानं थैमान घातलं आहे. लॉकडाऊनचा फायदा घेत अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिला जंगलात नेऊन तिच्यावर आळीपाळीनं सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार नराधमांना अटक केली आहे. त्यात अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. टोंक जिल्ह्यातील पचेवर पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे.
पसार होण्याच्या तयारीत होते भामटे..
पोलिसांनी सर्व आरोपींना शुक्रवारी कोर्टात हजर केलं. मुलीवर बलात्कार केल्यानंतर तिला गावाच्या बाहेर फेकून चारही आरोपी पसार होण्याच्या तयारीत होते. मात्र, त्याआधीच पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या.
हेही वाचा...दारुविक्रीच्या निर्णय़ाविरोधात अजब आंदोलन, दुकानाबाहेर केलं थेट चखण्याचं वाटप
पोलिस अधीक्षक आदर्श सिंधू यांनी सांगितलं की, आरोपींनी 5 मे रोजी मुलीचं अपहरण करुन तिच्यावर गॅंगरेप केला होता. तिघे कारमधून मुलीला जंगलात घेऊन गेले. तिथे त्यांचा आणखी एक साथीदार आला. चौघांनी मुलीवर रात्रभर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. एवढंच नाही तर आरोपींनी पीडितेला बेदम मारहाणही केली. घटनेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी आरोपींनी पीडितेला गावाबाहेर फेकून दिलं. सर्व आरोपी डिग्गी येथील आहेत. निसार खान उर्फ नसरिया, सलमान ऊर्फ खोबरा आणि जाकिर ऊर्फ राजरड़ा अशी तिन्ही आरोपींची नावं आहेत. चौथा आरोपी अल्पवयीन असल्यानं त्याची ओळख गोपनिय ठेवण्यात आली आहे.
हेही वाचा.. लॉकडाऊन नसतं तर उद्भवली असती अशी भयावह परिस्थिती, रिपोर्ट आला समोर
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी सवाई माधोपूर जिल्ह्यात गॅंगरेपची घटना समोर आली होती. कॉलेजच्या दोन विद्यार्थ्यांनी एका अल्पवयीन मुलीवर गॅंगरेप केला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.