मराठी बातम्या /बातम्या /देश /'रोजापेक्षा 4 वर्षांच्या दीक्षाचा जीव महत्त्वाचा', वकारने चिमुरडीसाठी तोडला रमझानचा उपवास

'रोजापेक्षा 4 वर्षांच्या दीक्षाचा जीव महत्त्वाचा', वकारने चिमुरडीसाठी तोडला रमझानचा उपवास

कोरोनासारख्या संकटात अनेक मदतीचे हात पुढे येत आहे. यातून एकमेकांमधील प्रेम, आदराची भावना वाढत आहे.

कोरोनासारख्या संकटात अनेक मदतीचे हात पुढे येत आहे. यातून एकमेकांमधील प्रेम, आदराची भावना वाढत आहे.

कोरोनासारख्या संकटात अनेक मदतीचे हात पुढे येत आहे. यातून एकमेकांमधील प्रेम, आदराची भावना वाढत आहे.

गोपालगंज, 8 मे : देशभरातील कोरोना (Corona Epidemic) संकटामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अशाच परिस्थीती मदतीसाठीही लाखो हात सोबत येत आहेत. यातच एक प्रेरणादायी बातमी समोर आली आहे.

बिहारमधील गोपालगंजमध्ये एकतेचं एक सुखदं चित्र समोर येत आहे. येथे एक मुस्लीम तरुणाने 3 वर्षांच्या एका चिमुरडीला रक्तदान देऊन तिचे प्राण वाचवले. उचकागावचे कैथवलिया गावातील 3 वर्षांची चिमुरडी दीक्षा कुमार थॅलेसेमियाग्रस्त आहे. या मुलीवर दिल्लीतील एम्स आणि लखनऊमधील पीजीआयमध्ये उपचार सुरू आहेत. देशभरात पसरणाऱ्या कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे ते आपल्या मुलीचा उपचार करण्यासाठी लखनऊ आणि दिल्ली येथे जाऊ शकत नव्हते.

शरीरात होता केवळ 5 पॉइंट हिमोग्लोबीन

दीक्षावर उपचार करण्यापूर्वी तिला रक्ताची नितांत गरज होती. दीक्षाच्या शरीरात केवळ 5 पॉइंट हिमोग्लोबिन होतं. त्यामुळे तिला रक्ताची अत्यंत गरज होती. जेव्हा पीडित मुलीच्या वडिलांनी आपल्या संपर्कात असलेल्या काही लोकांशी बातचीत केली तेव्हा गोपालगंज शहरातील जंगलीया भागात राहणाऱ्या 24 वर्षीय तरुण वकार अहमद पुढे आला. सध्या रमजानचा महिना असल्याने मुस्लिमांचा रोजा सुरू आहे. मात्र रोजानंतर करू मात्र सध्या रोजापेक्षा या चिमुरडीचा जीव वाचवणं आवश्यक असल्याचं सांगितलं. वकार पुढे म्हणाला त्यांचा रक्तगट बी पॉझिटिव्ह आहे आणि दीक्षाचा रक्तगटही बी पॉझिटिव्ह आहे. आज शुक्रवारी गोपालगंजच्या रुग्णालयात रक्तपेढीत वकारने रक्तदान केलं. दीक्षाच्या वडिलांनी वकारचे आभार व्यक्त केले आहे.

संबंधित -पुण्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत होणार मोठी वाढ; 9000 क्वारंटाइन बेड्सची तयारी

मुलीच्या वर्दीवरचे स्टार पाहतायत वडील, बापलेकीचा PHOTO होतोय व्हायरल

First published: