मराठी बातम्या /बातम्या /देश /Uttarakhand Glacier Burst : 'टनलमध्ये मानेपर्यंत...'; सुरक्षित बाहेर आलेल्या तरुणाने सांगितली 'साक्षात मृत्यूची' कहाणी

Uttarakhand Glacier Burst : 'टनलमध्ये मानेपर्यंत...'; सुरक्षित बाहेर आलेल्या तरुणाने सांगितली 'साक्षात मृत्यूची' कहाणी

चमोलीमध्ये हिमकडा कोसळल्याने नदीला आलेल्या महापूरानंतर आयटीबीपीकडून (ITBP) मदत आणि बचावकार्य सुरू आहे.

चमोलीमध्ये हिमकडा कोसळल्याने नदीला आलेल्या महापूरानंतर आयटीबीपीकडून (ITBP) मदत आणि बचावकार्य सुरू आहे.

चमोलीमध्ये हिमकडा कोसळल्याने नदीला आलेल्या महापूरानंतर आयटीबीपीकडून (ITBP) मदत आणि बचावकार्य सुरू आहे.

चमोली, 8 फेब्रुवारी : उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील जोशीमठजवळ हिमकडा कोसळल्याने अचानक आलेल्या महापूरात जवळपास 125 हून अधिक मजूर बेपत्ता आहेत. तर आतापर्यंत 15 जणांना सुरक्षितपणे वाचवण्यात यश आलं आहे. हिमकडा कोसळल्यानंतर (Uttarakhand Glacier Burst) टनलमधून सुरक्षित बाहेर आलेल्या एका मजूराने आपली कहाणी सांगितली आहे. याचा व्हिडीओ उत्तराखंड पोलिसांनी (Uttarakhand Police) ट्वीट करत शेअर केला आहे.

चमोलीमध्ये हिमकडा कोसळल्याने नदीला आलेल्या महापूरानंतर आयटीबीपीकडून (ITBP) मदत आणि बचावकार्य सुरू आहे. आयटीबीपीचे जवान अरुंद बोगद्यात, टनलमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर करत आहेत. या टनलमधून बाहेर पडल्यानंतर एका मजूराने घटनेची माहिती दिली आहे. अरुंद टनलमध्ये मानेपर्यंत मलबा भरला असल्याचं त्याने सांगितलं. बोगद्याच्या आत संपूर्ण ढिगारा आमच्या मानेपर्यंत भरला होता. मी स्वत: लोखंडी रॉड पकडून बाहेर आलो आहे, असं यातून वाचलेल्या त्या मजूराने सांगितलं. त्याचा व्हिडीओ पोलिसांनी ट्विटरवर शेअर केला आहे.

(वाचा - उत्तराखंडमधील महाभयंकर दृश्यांनंतर एक आशादायी VIDEO)

हिमकडा कोसळल्यानंतर तेथे दोन वीज प्रकल्पांवर अनेक मजूर काम करत होते. त्यापैकी 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तपोवन वीज प्रकल्पाजवळील एका टनलमध्ये अडकलेल्या सर्व 15 मजूरांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. तर अद्याप 125 जण बेपत्ता आहेत.

रविवारी सकाळी 10.45 च्या सुमारास हिमकडा कोसळून अचानक महापूर आला. पाण्याच्या वेगवान प्रवाहाने ऋषीगंगा हायड्रो प्रोजेक्ट पूर्णपणे उद्धस्त झाला आहे. गावातील अनेक घरं वाहून गेली आहेत. नदीपलीकडच्या गावांना जोडणारे पूलही वाहून गेले आहेत. एनडीआरएफ, आयटीबीपी, एसडीआरएफ मिळून 250 हून अधिक जवान मदत आणि बचाव कार्य करत आहे.

दरम्यान, राज्य आपत्ती व्यवस्थापनाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रिद्धिमा अग्रवाल यांनी सांगितलं की, दोन्ही वीज प्रकल्पांच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 100 ते 150 लोकांबाबत माहिती नसल्याचं समोर आलं आहे. अचानक आलेल्या महापूरानंतर या लोकांबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.

First published:

Tags: Uttarakhand