मुंबई, 7 ऑगस्ट : केरळमधल्या कोझिकोड विमातळवर एअर इंडियाच्या विमानाला मोठा अपघात (Air India Express Crash) झाला आहे. या भयंकर अपघातात वैमानिकासह आणखी काहीजण ठार झाल्याचं वृत्त आहे. तर तब्बल 138 प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातात जीव गमावलेले पायलट दीपक वसंत साठे हे महाराष्ट्रातील असल्याची माहिती आहे. विमान धावपट्टीवर उतरत होतं, तेव्हा प्रचंड पाऊस सुरू होता. केरळमध्ये गेल्या 24 तासांत मुसळधार पाऊस सुरू आहे. धावपट्टीवरून विमान घसरलं असावं असा प्राथमिक अंदाज आहे. याच अपघातात दीपक साठे या महाराष्ट्राच्या सुपुत्राचा मृत्यू झाला. कॅप्टन दीपक वसंत साठे हे माजी भारतीय वायुसेना पायलट होते. दीपक साठे यांना महत्त्वाच्या पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले होते. ते एक कुशल लढाऊ पायलट होते. मृतांची संख्या वाढली विमान अपघातातील मृतांची संख्या वाढत असून आतापर्यंत 14 जणांनी आपला जीव गमावला असल्याची माहिती समोर आली आहे. तर 123 प्रवासी जखमी झाले असून 15 प्रवासी गंभीर जखमी आहेत. दरम्यान, एअर इंडियाचं हविमान रनवेवरून घसरलं असून विमानाला मोठ नुकसान झालं. या विमानात 170 प्रवासी होते. दुबईहून हे विमान कोझीकोडला आलं होतं. IX 1344 हे विमान होतं. कोझिकोड इथे धावपट्टीवर उतरत असताना हा अपघात झाला. ‘वंदे भारत मिशन’च्या अंतर्गत हे विमान दुबईहून भारतात येत होतं. कोझिकोड विमानतळ हे टेबल टॉप एअरपोर्ट आहे. त्यामुळे इथे विमान उतरत असताना धावपट्टीवर खूपच काळजीपूर्वक उतरवावं लागतं. त्यात इथे पाऊस होता. त्यामुळे कदाचित पायलटला अंदाज आला नसावा. त्यामुळे 30 फूट खाली ते घसरलं आणि त्यातून हा अपघात झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.