मराठी बातम्या /बातम्या /देश /27 वर्षीय IPS अधिकाऱ्याची अतुलनीय देशभक्ती, कोरोनाला हरवलं; आता करतोय रुग्णसेवा

27 वर्षीय IPS अधिकाऱ्याची अतुलनीय देशभक्ती, कोरोनाला हरवलं; आता करतोय रुग्णसेवा

देशभरातील कोरोना योद्धा आपल्या जीवाची बाजी लावून देशसेवा करीत आहेत. त्यांच्या कर्तव्यनिष्ठेला सलाम

देशभरातील कोरोना योद्धा आपल्या जीवाची बाजी लावून देशसेवा करीत आहेत. त्यांच्या कर्तव्यनिष्ठेला सलाम

देशभरातील कोरोना योद्धा आपल्या जीवाची बाजी लावून देशसेवा करीत आहेत. त्यांच्या कर्तव्यनिष्ठेला सलाम

इंदूर, 7 मे : कोरोनाव्हायरसला (Coronavirus) हरवल्यानंतर 27 वर्षीय आयपीएस अधिकारी आदित्य मिश्रा रुग्णांच्या मदतीसाठी पुढे आला आहे. देशभरात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनावर नेमका उपचार नसल्याने विविध प्रयोग केले जात आहे. प्लाझ्मा थेरेपी ही त्यापैकी एक आहे. एका आयपीएस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती. त्याने तो लढा जिंकला. आता हा अधिकारी कोरोनाच्या इतर रुग्णांच्या मदतीसाठी पुढे आला आहे.

गुरुवारी मिश्रा एका सरकारी रुग्णालयात प्लाझ्मा दान केले. महाराजा यशवंतराव चिकित्सालयातील ट्रान्सफ्युजन मेडिकल विभागाचे प्रमुख डॉ. अशोक यादव यांनी सांगितले की, वर्ष 2018 चे प्रशिक्षणार्थी असलेले आयपीएस अधिकारी आदित्य मिश्रा यांनी रुग्णालयात आपला प्लाझ्मा दान केला. सध्या विविध राज्यांमध्ये कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी प्लाझ्मा थेरेपीचा उपयोग केला जात आहे. कोरोनातून बरे झालेल्या  रुग्णांना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यांच्या प्लाझ्माचा वापर करीत रुग्णाच्या शरीरात प्रतिजैविक तयार करण्याचा या मागील प्रयत्न आहे.

प्लाझ्मा दान केल्यानंतर मिश्रा यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, गंभीर रुग्णांना माझा प्लाझ्मा दिल्यात ते त्यातून बाहेर येऊ शकतात. असं झालं तर मी कोणाचा तरी जीव वाचवला याचा मला खूप आनंद होईल.

महाराष्ट्रानंतर इतरही राज्यांमध्ये प्लाझ्मा थेरेपीचा प्रयोग केला जात आहे. देशातल्या अन्य राज्यांपेक्षा सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहे. त्यामुळे सरकारची चिंतेत आहे. मृत्यूदर कमी कमी करण्यासाठी सरकारकडून आणखी उपायोजना केल्या जात आहेत. प्लाझ्मा थेरेपी हा काही कोव्हिड-19 वरचा उपाय नाही. मात्र शेवटच्या स्टेजमध्ये असलेल्या रुग्णांना वाचविण्यासाठी याचा वापर करण्यात येणार आहे. कोरोनामुक्त झालेल्यांच्या शरिरात कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी अँटीबॉडीज तयार झालेल्या असतात. त्याचा उपयोग कोरोनाविरुद्ध करण्यासाठी जी पद्धत आहे त्यालाच प्लाझ्मा थेरेपी असं म्हटलं जातं.

संबंधित -मुंबईच्या आणखी एका रुग्णालयात धक्कादायक प्रकार, कोरोना मृतदेहांची झाली अदलाबदल

कोरोनाला रोखणारा आयुर्वेदिक काढा, 6000 जणांवर टेस्ट केल्याचा गुजरात सरकारचा दावा

First published:
top videos

    Tags: Corona virus in india