कोरोनाला रोखणारा आयुर्वेदिक काढा, 6000 लोकांवर टेस्ट केल्याचा गुजरात सरकारचा दावा

कोरोनाला रोखणारा आयुर्वेदिक काढा, 6000 लोकांवर टेस्ट केल्याचा गुजरात सरकारचा दावा

गुजरातमध्ये 6 हजार लोकांवर कऱण्यात आलेल्या टेस्टनंतर त्यातील फक्त 11 जणांनाच कोरोना झाला. तोसुद्धा त्यांनी डोस पूर्ण केले न केल्यानं असं गुजरात सरकारने म्हटलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 07 मे : देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. गुरुवारपर्यंत देशात कोरोनाचे 52952 रुग्ण आढळले आहेत. तर आतापर्यंत 1783 लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांत कोरोनाच्या रुग्णांची संख्या जास्त आहे. गुजरात याबाबत दुसऱ्या क्रमांकावर असून आतापर्यंत राज्यात 396 लोकांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, कोरोनाबाबत गुजरात सरकारने मोठा दावा केला आहे. सरकारकडून सांगण्यात आलं की राज्यात कोरोना व्हायरसच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी आयुर्वेदिक काढा उपयोगी पडत आहे. यानंतर सरकारला सोशल मीडियावर ट्रोलही करण्यात आलं.

गुजरातच्या मुख्य सचिन जयंती रवि यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी माहिती देताना सांगितलं की, राज्यात 3585 लोकांना आयुर्वेदिक काढा देण्यात आला. तर 2625 लोकांना होमिओपॅथी औषधे देण्यात आली. यातील फक्त 11 लोकांनाच कोरोना झाल्याचं समोर आलं. त्यांना कोरोना झाला कारण त्यांनी डोस पूर्ण केला नाही असंही जयंती रवि यांनी म्हटलं.

जयंती रवि यांनी सांगितल्यानुसार, क्वारंटाइन झालेल्या लोकांची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी हा उपाय आहे. त्यांचे हे वक्तव्य डीडी न्यूज गुजरातीच्या ट्विटर हँडलवरसुद्धा आहे. यात म्हटलं आहे की, गुजरात सरकारने याबाबत आयुष मंत्रालयाला माहिती दिली आहे. यात क्वारंटाइन झालेल्या 6000 हजार लोकांना आयुर्वेदिक काढा दिला आणि त्याचा फायदाही झाला. ज्या लोकांनी डोस पूर्ण केला त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याचंही सांगितलं.

हे वाचा : भारतीय वंशाच्या पत्नीपासून घटस्फोट घेण्यासाठी UK च्या पंतप्रधानांचा कोटींचा करार

गुजरात सरकारच्या या दाव्यात तथ्य किती आहे याबाबत अद्याप काही समोर आलेलं नाही. मात्र सोशल मीडियावर अनेक युजर्सनी यावर प्रश्न उपस्थित केला आहे.

हे वाचा : विदेशातून येणाऱ्या भारतीयांसाठी 5 स्टार क्वारंटाईन कक्ष, पालिकेनं अशी केली तयारी

First published: May 7, 2020, 10:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading