ज्योत्सना गंगणे, प्रतिनिधी मुंबई, 07 मे : मुंबईच्या सायन हॉस्पिटलमधील कोरोना मृतदेहांच्या दुर्लक्षानंतर रेल्वेच्या रुग्णालयातही वैद्यकीय प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईच्या जगजीवन राम रेल्वे रुग्णालयात कोरोना मृत रूग्णांच्या मृतदेहात आदला-बदल झाल्याचं समोर आलं आहे. यामुळे मृत रूग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयासमोर गोंधळ घातला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 4 तारखेला मृत व्यक्ती आजारी पडला होता. रेल्वे कर्मचारी असलेल्या व्यक्तीला मुंबई मध्यवर्ती भागातील जगजीवन राम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. कोरोनाचा अहवाल सकारात्मक असल्यानं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मृत व्यक्तीच्या कुटुंबातील त्याचा भाऊ आणि मित्र सकाळी 6.30 -7 वाजता रुग्णालयात पोहोचले. रुग्णालयात 10 तास घालवूनही रुग्णालयाने त्यांचा मृतदेह दिला नाही. इतके तास थांबल्यानंतर कुटूंबातील सदस्यानं चौकशी केली आणि मृतदेह देण्यास उशीर करण्याचं कारण विचारलं असता त्या व्यक्तीने सांगितलं की, त्यांच्या माणसाचा मृतदेह एका दुसऱ्या कुटुंबाकडे देण्यात आला आहे. त्यामुळे मृत नातेवाईकाच्या कुटुंबांनी रुग्णालयात गोंधळ घालण्यास सुरूवात केली. अमित ठाकरेंना दिलेला शब्द मुख्यमंत्र्यांनी पाळला, अवघ्या 12 तासांत सोडवला प्रश्न दरम्यान, नितेश राणे यांनीही सायन हॉस्पिटलमधील एक व्हिडिओ आपल्या ट्वीटर अकाउंटवर शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये हॉस्पिटलमधील भीषण परिस्थिती समोर आली. हॉस्पिटलमधील एका वार्डमध्ये रुग्ण उपचार घेत आहे. या वार्डात मोठ्या संख्येनं रुग्ण दिसून येत आहे. एकीकडे रुग्ण उपचार घेत आहे तर तिथेच एका खाटेवर मृतदेह बांधून ठेवण्यात आले आहे. तर आणखीही मृतदेह हे याच वार्डमध्ये स्ट्रेचरवर ठेवण्यात आल्याचे दिसून आले आहे. विदेशातून येणाऱ्या भारतीयांसाठी 5 स्टार क्वारंटाईन कक्ष, पालिकेनं अशी केली तयारी हॉस्पिटल प्रशासनाकडून अशी व्यवस्था केली जात आहे का? असा सवाल उपस्थितीत करत नितेश राणे यांनी मुंबई पालिकेवर टीका केली आहे. परंतु, हा व्हिडिओ कधीचा आहे आणि कुणी रेकॉर्ड केला, याबद्दल नितेश राणे यांनी कोणतीही माहिती दिली. सायन हॉस्पिटलकडूनही या प्रकरणावर अजून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. हॉटस्पॉट असलेल्या पुण्यात रुग्णांच्या जीवाशी खेळ, सलाईनमध्ये सापडलं शेवाळ संपादन - रेणुका धायबर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)








