नवी दिल्ली, 26 डिसेंबर: नवीन वर्ष सुरू होण्यासाठी आता एक आठवड्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. 2021 पासून काही नियमांत बदल होणार आहेत. तर काही बदल असे होणार आहेत, की ज्यांचा तुमच्या जीवनावर थेट परिणाम होईल. प्रामुख्याने एलपीजी गॅस सिलेंडरच्या निश्चित होणाऱ्या किंमतींच्या नियमात बदल होण्याची शक्यता आहे. दरम्यान सरकारी तेल कंपन्या (Govt Oil companies) दर आठवड्याला गॅस सिलेंडरच्या किंमतींचा (LPG Gas cylinder Price)आढावा घेण्याची योजना आखत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार सार्वजनिक तेल कंपन्या या योजनेसाठी तयारी करत आहेत. सध्या दर महिन्याला गॅस सिलेंडरच्या किंमतींचा आढावा घेतला जातो, ज्यानंतर किंमती कमी होतात किंवा वाढतात. महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलेंडरचे नवे दर जारी केले जातात.
डिसेंबरमध्ये दोन वेळा वाढले आहेत दर
डिसेंबर महिन्यात दोन वेळा एलपीजी गॅसच्या किंमतीत वाढ झाली आहे. आधी 1 तारखेला आणि त्यानंतर 15 तारखेला ही दरवाढ करण्यात आली. ही दरवाढ पाहता एलपीजी वितरकांचं असं म्हणणं आहेकी आता दर आठवड्याला एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत वाढ होईल. यामुळे तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागेल.
(हे वाचा-IRCTC तिकिट बुकिंग प्रणालीत होणार बदल, प्रक्रिया जलद करण्याचा रेल्वेचा मानस)
काही मीडिया अहवालांच्या मते तेल कंपन्या साप्ताहिक स्वरुपात एलपीजी गॅसच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेऊ शकतात. दररोज बदल होणाऱ्या इंधनाच्या (पेट्रोल आणि डिझेल) दरांची आता ग्राहकांना सवय झाली आहे. अशावेळी एलपीजीच्या किंमतीही साप्ताहिक स्वरुपात रिव्हाइज केल्या जाऊ शकतात. दरम्यान याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही आहे.
तेल कंपन्यांना मिळेल दिलासा
तेल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तेल कंपन्यांचं होणारं नुकसान टाळण्यासाठी ही योजना आखण्यात आली आहे. दर महिन्याला घेतलेल्या आढाव्यानुसार जर किंमती कमी होत राहिल्या तर तेल कंपन्यांना नुकसान झेलावे लागते. तर या नवीन व्यवस्थेनुसार कंपन्यांना मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
काय आहेत सध्याचे दर
(हे वाचा-महाराष्ट्रातील या बँकेचा परवाना RBI ने केला रद्द, ठेवीदारांवर काय होणार परिणाम?)
एलपीजी सिलेंडर के वर्तमान में दाम
सध्या दिल्लीमध्ये विना सबसिडीच्या 14.2 किलोच्या एलपीजी सिलेंडरचे मुल्य 694 रुपये प्रति सिलेंडर आहे, मुंबईमध्ये देखील हाच भाव आहे. कोलकातामध्ये या सिलेंडरचा दर 720.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 710 रुपये प्रति सिलेंडर आहे. 15 डिसेंबरपासून ही दरवाढ लागू झाली आहे. 5 किलोग्रॅमच्या सिलेंडरमध्ये देखील 18 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. 19 किलोच्या कमर्शिअल एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतींमध्ये 36.50 रुपये प्रति सिलेंडरची वाढ झाली आहे. केंद्र सरकारकडून 12 गॅस सिलेंडरसाठी सबसिडी मिळते.