मराठी बातम्या /बातम्या /मनी /

तुम्ही ITR फाइल केला का? ही आहे शेवटची तारीख, 3.97 कोटी करदात्यांनी भरला रिटर्न

तुम्ही ITR फाइल केला का? ही आहे शेवटची तारीख, 3.97 कोटी करदात्यांनी भरला रिटर्न

तुम्ही जर करपात्र असाल, तर दिलेल्या तारखेपर्यंत आयटीआर (Income Tax Return) दाखल करणं आवश्यक आहे.

तुम्ही जर करपात्र असाल, तर दिलेल्या तारखेपर्यंत आयटीआर (Income Tax Return) दाखल करणं आवश्यक आहे.

तुम्ही जर करपात्र असाल, तर दिलेल्या तारखेपर्यंत आयटीआर (Income Tax Return) दाखल करणं आवश्यक आहे.

    नवी दिल्ली, 26 डिसेंबर: आयकर विभागाच्या मते 24 डिसेंबर 2020 पर्यंत 3.97 कोटी करदात्यांनी असेसमेंट इयर 2020-21 साठी आयटीआर (Income Tax Return) दाखल केला आहे. आयकर विभागाने यासंदर्भात ट्वीट करून माहिती दिली आहे. शिवाय आयकर विभागाने या ट्वीटच्या माध्यमातून उर्वरित करदात्यांना लवकरात लवकर आयटी रिटर्न भरण्याचे आवाहन देखील केले आहे. ITR दाखल करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2020 आहे. कोरोना पँडेमिकमुळे करदात्यांसाठी 31 डिसेंबरपर्यंत ही तारीख वाढवण्यात आली होती. गेल्यावर्षी आयटी रिटर्न फाइल करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2019 होती. आयकर विभागाच्या मते 2.27 कोटी करदात्यांनी ITR-1 फॉर्म, 85.20 लाख करदात्यांनी ITR-4 फॉर्म, 46.78 लाख करदात्यांनी ITR-3 फॉर्म आणि 28.74 लाख ITR-2 फॉर्म भरला आहे. (हे वाचा-म्हातारपणीचा आधार ठरतील मोदी सरकारच्या या योजना, कमी गुंतवणुकीतून चांगला रिटर्न) व्यक्तिगत करदात्यांसाठी AY 2020-21 साठी 31 डिसेंबर 2020 ही शेवटची तारीख आहे. मात्र ज्या लोकांच्या खात्यासाठी ऑडिट आवश्यक आहे, त्यांच्यासाठी रिटर्न दाखल करण्याची तारीख 31 जानेवारी 2021 आहे. ITR भरण्याची तारीख कोरोनामुळे 31 जुलैवरून 31 ऑक्टोबर 2020 करण्यात आली होती. त्यानंतर ही तारीख 31 डिसेंबर करण्यात आली आहे. तुम्हाला ऑफलाइन किंवा ऑनलाइन पद्धतीने आयटीआर फाइल करता येईल. वेळेत ITR फाइल करण्याचे फायदे शेवटच्या दिवसाआधी ITR फाइल करण्याचे अनेक फायदे आहेत. काही चूक झाली असेल, तर वेळेआधी फॉर्म भरलेला असल्यास ती सुधारण्याची संधी मिळते. ITRमध्ये चूक झाल्यास इन्कम टॅक्स विभागाकडून दंड आकारला जाऊ शकतो किंवा नोटीस बजावली जाऊ शकते. (हे वाचा-दरमहा 42 रुपये गुंतवून मिळवा आयुष्यभर पेन्शन, या सरकारी) लवकर ITR फाइल केला असेल, तर करदात्यांना इन्कम टॅक्स रिफंड लवकर मिळतो. रिटर्न फाइल करण्याआधी फॉर्म 16, रेंटल अॅग्रीमेंट्स, प्रॉपर्टी टॅक्स रिसिट्स, होम लोनची इंटरेस्ट सर्टिफिकेट्स, बँक स्टेटमेंट, बँक लोनची इंटरेस्ट सर्टिफिकेट्स, कॅपिटल गेन स्टेटमेंट, टॅक्स सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट्स आदी कागदपत्रं तयार ठेवावीत.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Income tax, Money

    पुढील बातम्या