बीजिंग, 30 मार्च : संपूर्ण देश कोरोनाशी (Coronavirus) लढा देत आहे. काही दिवसांपूर्वी चीनमधील (China) कोरोनाच्या (Covid - 19) रुग्णांची संख्या कमी झाल्याने येथील लॉकडाऊन (Lockdown) शिथिल करण्यात आलं. त्यामुळे सध्या चीनमध्ये कोरोनावर विजय मिळविल्याचा आनंद साजरा केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार चीनमध्ये ससा आणि बदकाचे मांस खाऊन या साथीवर विजय साजरा करण्यात आला. एवढेच नव्हे तर पुन्हा एकदा चीनमध्ये वटवाघुळाची जोरदार विक्री सुरू झाली आहे. चीनमधील वुहान शहरातून कोरोना व्हायरस जगभरात पसरला होता. पॅंगोलिनकडून वटवाघळाच्या माध्यमातून कोरोना व्हायरसने माणसांच्या शरीरात प्रवेश केल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
संबंधित - अमेरिकेत कोरोनामुळे होऊ शकतात 2 लाख मृत्यू; 2 आठवड्यात आकडा वाढण्याचं कारण
डेली मेलनुसार, शनिवारी चीनमध्ये कोरोनावर विजय मिळविल्याबद्दल आनंद साजरा करण्यात आला. यादरम्यान कुत्रा, मांजर, ससा आणि बदलाच्या मांसचं सेवन करण्यात आलं. यासाठी चीनमधील मीट मार्केट सुरू करण्यात आले. काही दिवसांपूर्वी वुहानमध्ये अशाच एका मीट मार्केटमधून कोरोना पसरला होता.
जगभरात 34 हजार मृत्यू
चीनमधून पसरलेल्या या व्हायरसमुळे जगभरातील 34 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. शिवाय आतापर्यंत 7,23,434 जणांना संसर्ग झाला आहे. काही विशेषज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या काही कोरोनामुळे लाखो लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. सांगितले जात आहे की चीनच्या दक्षिण पश्चिम भागात गुइलिन परिसरात हजारो लोक मीट मार्केट पोहोचले आणि तेथे त्यांनी खुल्या अवस्थेच विक्री केले जाणारे मांस आणि जिवंत प्राणी खरेदी केले. या भागात शनिवारी लोकांची मोठी गर्दी जमा झाली होती. येथे कुत्रा, मांजरीचे मांस विकले जात होते. कोरोनाचे संकट संपल्याचे येथील नागरिकांना वाटत आहे.
संबंधित - खरे लढवय्ये! लॉकडाऊनमुळे हातातंल काम गेलं, भाजी विकून उभा केला संसार
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.